तरुण भारत

राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे उभादांडा, नवाबाग, दाभोलीतील नुकसानग्रस्तांना ताडपत्रीचे वाटप

वेंगुर्ले / वार्ताहर-

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून तौक्ते या चक्रीवादळाने घरांच्या छप्परांचे झालेले नुकसान पाहून पक्षाच्या पाठविण्यांत आलेल्या ताडपत्र्यांचे वाटप उभादांडा, नवाबाग व दाभोली या तीन गावातील तौक्ते वादळ नुकसानग्रस्तांना वेंगुर्ले तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर यांच्या हस्ते करण्यांत आले.
तौक्ते या चक्रीवादळाने घरांच्या छप्परांचे झालेले नुकसान व सुरू झालेल्या मान्सून पावसामुळे घरात पाणी शिरुन आणखी होणारे घरातील साहित्याच्या नुकसानीची अवस्था लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत पुरविण्यांत आलेल्या ताडपत्र्यांचे वाटप राष्ट्रवादी कॉग्रसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उभादांडा, नवाबाग व दाभोली या तीन गावातील नुकसानग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस मकरंद परब, जिल्हा चिटणीस मकरंद परब, दाभोली सरपंच उदय गोवेकर, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष अमिन हकीम, बबन पडवळ, मोतेस डिसोझा, सुभाष तांडेल, समिन हकीम आदींसह स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

चिपळुणातील शिवनदीचा गाळ अडकला राजकारणात!

Patil_p

व्यापाऱयांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करेन!

NIKHIL_N

‘ऍप’साठी शाळांचा पालकांवर दबाव

NIKHIL_N

नगराध्यक्षांच्या वाढदिवस पार्टीच्या फोटोवर टिकेची झोड

NIKHIL_N

आयकर पात्र, सरकारी नोकरदारांना नोटिसा

NIKHIL_N

जिह्यात नव्याने 77 रूग्ण, दोघांचा मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!