तरुण भारत

सांगली : पत्नीला मारहाण प्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी / मिरज

दुसऱ्या पत्नीसोबत फिरत असताना पहिल्या पत्नीने घरी चला असे, म्हटल्यानंतर माजी नगरसेवक अशोक कांबळे याने स्वतःच्या पत्नीला सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करून मारहाण केली. याबाबत कांबळे याच्या पहिल्या पत्नीने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अशोक कांबळे याच्यासह त्याच्या दुसऱ्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

याबाबत संबधित महिलेने दिलेली फिर्याद आणि शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कांबळे हा आरपीआय युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे. तो गेल्या चार महिन्यांपासून आपल्या पहिल्या पत्नीला सोडून दुसऱ्या पत्नीच्या घरी रहात होता. रविवारी 13 जून रोजी कांबळे याच्या पहिल्या पत्नी बाजारात गेल्या असता अशोक कांबळे हा दुसऱ्या पत्नीसोबत दिसून आला. त्यावेळी सदर महिलेले अशोक कांबळे याला मी तुमची पत्नी असून, घरी चला, असे म्हटले असता भांडण झाले. त्यावेळी अशोक याने पहिल्या पत्नीला सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला. तसेच अशोकच्या दुसऱ्या पत्नीनेही मारहाण केली. याबाबत पीडित महिलेले शहर पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अशोक कांबळे याच्यासह त्याच्या दुसऱ्या पत्नीवर 354, 323 आणि 504 आदी कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

काळ्या कोळशातून फुलतो त्यांचा संसार ! ….

triratna

सांगली : माधवनगर जकात नाका येथे पोलिसांची कारवाई

triratna

सांगली : आँगस्ट क्रांतीदिनी बलवडीच्या क्रांतिस्मृतीवनात बालकांकडून अभिवादन

triratna

मिरज-कृष्णाघाट उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरु होणार

triratna

सांगली जिल्ह्यात 255 जण कोरोनामुक्त तर नवे 185 रूग्ण

triratna

कडेगाव : नेर्लीतील कोरोनाबाधिताचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!