तरुण भारत

सांगली : मायक्रो फायनान्स कंपनीवर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल करा

पुरोगामी संघर्ष परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

हफ्ते वसूल करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीवर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल करा, अशा मागणीचे निवेदन पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी यांना सोमवारी देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, मायक्रो फायनान्स कंपन्या भरमसाठ व्याज आकारणी करून हातावर पोट असलेल्या महिलांना दमदाटी करून लॉकडाउनच्या  काळातील हप्ते वसूल करणार नाही, असे सांगून हफ्ते वसूली करत आहेत. शिवाय तुमच्या नावापुढे लाल रेष मारून तुमचे सिबिल खराब करीन, असे धमकीही दिली जात असून कर्जवसुली दमदाटीने चालू आहे.

सदर कंपन्यांचे व्याजदर 20 ते 22 टक्के पेक्षा जास्त पडतात. याची शासकीय तपासणी करून सदर कंपनीवर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा स्वाती सौंदडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष खंडू कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नयना लोंढे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य सावळा खुडे,शहर जिल्हाध्यक्षा संगीता साठे, मनपा क्षेत्र अध्यक्षा ज्योती गोकाक, रतन लोखंडे, विजय सौंदडे, वासू गोकाक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

सांगली : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गाड्या फोडल्या

triratna

उद्या सुपर फ्लावर मून छायाकल्प, ग्रहणात होणार महा चंद्रोदय – डॉ. शंकर शेलार

triratna

बांबू लागवड मार्गदर्शनासाठी पाशा पटेल, संजीव करपे येणार सांगलीत

triratna

सांगली : कर्मवीर पतसंस्थेकडून १३ टक्के लाभांश जाहीर

triratna

म्हैसाळमध्ये हवेत गोळीबार

triratna

सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात पाच जण कोरोना बाधित

Shankar_P
error: Content is protected !!