तरुण भारत

सातारच्या दानशूर इंदूआजींचा मनसेकडून सत्कार

गोडोली / प्रतिनिधी : 

आपल्या तुटपुंज्या कमाईतून उदरनिर्वाहाचा खर्च भागवून उर्वरीत रक्कम सतत दान करणाऱ्या इंदूआजींचे कार्य ‘तरुण भारत’ने उजेडात आणले. या माऊलीने सामाजिक बांधिलकीतून केलेले कार्य थक्क करणारे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आजींना भेटून त्यांना साडी भेट देत कृतज्ञता व्यक्त केली. इंदूआजींच्या दार्तृत्वाने आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन मनसेचे शहर अध्यक्ष राहूल पवार यांनी व्यक्त केले.

Advertisements

सातारच्या इंदूआजीच्या दार्तृत्वाची महती ‘तरुण भारत’ने सविस्तर मांडली. या दार्तृत्वाची चर्चा सुरू झाली असून, आजींना प्रत्यक्ष भेट त्यांनी केलेले आजपर्यंतचे कार्य त्यांच्या कडून ऐकले. अलौकिक कार्य असून याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी,पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून त्यांना साडी भेट देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मनसेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सोनली शिंदे, शहर अध्यक्ष वैशाली क्षीरसागर, जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, शहर अध्यक्ष राहुल पवार, उपाध्यक्ष अझहर शेख ,भारत रावळ,वैभव वेळापुरे, चैतन्य जोशी,गणेश पवार,सागर पवार, अर्चना जगदाळे, प्रेरणा निकम,सुषमा गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Stories

जलशक्ती मंत्रालयतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा

Patil_p

रहिमतपूर नगर परिषदेच्या आदर्श रमाई घरकुलाचे जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

triratna

नाक्यावर भटक्या प्राण्यांची दादागिरी

Patil_p

शहर परिसरात सहा जुगार अड्डय़ांवर पोलिसांची कारवाई

Patil_p

पिक नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल द्या

Patil_p

अजिंक्यतारा वरुन येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करा

Shankar_P
error: Content is protected !!