तरुण भारत

पश्चिम बंगालमध्ये 1 जुलैपर्यंत निर्बंध कायम; यामध्ये असणार सूट

ऑनलाईन टीम / कोलकाता : 


कोरोना महमारीच्या पार्श्वभूमीवर ममता सरकारने 1 जुलैपर्यंत निर्बंध वाढविण्यात आले आहेत. यासोबतच राज्य सरकारने आवश्यक सेवांमध्ये सूट देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी दिली. 

Advertisements

त्या म्हणाल्या, सर्व सरकारी कार्यालये आणि खाजगी संस्था 25 % क्षमतेने सुरू केली जाणार आहेत. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या,  सर्व सरकारी कार्यालयात 25 % क्षमतेने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरू होणार आहे. यासोबतच खाजगी आणि कार्पोरेट ऑफिसमध्ये देखील 25 % क्षमतेने कर्मचारी काम करतील. 


सरकारने 1 जुलै पर्यंत निर्बंध वाढविले असले तरी काही आवश्यक सेवांमध्ये सूट दिली आहे. या अंतर्गत शॉपिंग मॉल आणि कॉम्प्लेक्स सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू ठेवली जाणार आहेत. यामध्ये केवळ 50 % च कर्मचारी उपस्थित असणार आहेत. या सोबतच खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यास परवानगी असेल मात्र, प्रेक्षकांना स्पर्धा बघण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. 

  • काही शर्तींसह हॉटेल आणि बार होणार सुरू


यासोबतच राज्यातील हॉटेल आणि बार देखील दुपारी 12 ते रात्री 8 या वेळेत 50 टक्के ग्राहक क्षमतेने सुरू ठेवली जाणार आहेत. तर रात्री 9 ते सकाळी 5 यावेळेत नागरिकांना ये जा करण्यास बंदी असेल. यासोबतच सर्व शिक्षण संस्था अजूनही बंदच असतील. 

Related Stories

उत्तराखंड : कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 79 हजारांचा टप्पा

pradnya p

पर्युषण काळात मुंबईतील तीन जैन मंदिरे उघडणार

Patil_p

दिल्ली, प.बंगालमध्ये भाजपचीच सत्ता येणार : अमित शाह

prashant_c

मोदींना उद्देशून ममतादीदींची वादग्रस्त टिप्पणी

Patil_p

महाराष्ट्रात 2 लाख 6 हजार 619 रुग्ण कोरोनाबाधित

pradnya p

चर्चा असफल ठरल्यास लष्करी बळाचा पर्याय

Patil_p
error: Content is protected !!