तरुण भारत

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

बार्शी येथील डॉ. संजय अंधारे यांच्या कारभाराची चौकशी करा या मागणीसाठी केले आंदोलन

प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुश्रुत हॉस्पिटलच्या डॉ. संजय खंदारे यांनी रुग्णास मारून प्रोग्रेस रिपोर्ट फाडले. संबंधित कुटुंबातील धमकी दिल्याप्रकरणी बार्शी येथील संदीप सुतार 33 वर्षीय युवकाने सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान तातडीने पोलिसांनी त्या युवकाला पकडून ताब्यात घेतले.

याबाबत संदीप सुतार बोलताना म्हणाले, माजी आई बार्शीतील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आयसीयूमध्ये दाखल होत्या. मात्र त्याठिकाणी असलेले डॉ. संजय अंधारे यांनी व्यवस्थित उपचार केला नाही. हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणा झाल्याने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्याबाबत सर्व पुरावे गोळा करुन सुतार यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना निवेदन दिले मात्र कोणतीही दखल घेतली गेली.

नाही त्यामुळे वैतागून त्यात  33 वर्षीय युवक संदीप सुतार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घालून दिली आहे. दरम्यान पोलिसांनी सुतार यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलिस ठाण्यात नेले आहे. दरम्यान सुतार याने अंगावर डिझेल ओतून घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Related Stories

देवेंद्र फडणवीस यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद

triratna

सोलापूर : कुर्डुवाडीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

triratna

डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये गर्जली मराठमोळी शाहिरी!

prashant_c

सोलापूर शहरात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

सोलापूर : शहरात ४८ तर ग्रामीणमध्ये ३१ पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

सांगली : मुख्याधिकारी अरविंद माळी यांची पंढरपुरला पदोन्नतीवर बदली

triratna
error: Content is protected !!