तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्य़ात कोरोनाचे 37 बळी,1184 रूग्ण, 1568 कोरोनामुक्त

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हय़ात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 37 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 184 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 130 झाली आहे.

जिल्हय़ात सोमवारी कोरोनाने 37 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 205 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 223, नगरपालिका क्षेत्रात 640, शहरात 842 तर अन्य 500 आहेत. मृतांमध्ये जिल्हय़ांतील 34 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 568 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 18 हजार 159 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 184 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 42, भुदरगड 33, चंदगड 15, गडहिंग्लज 21, गगनबावडा 6, हातकणंगले 126, कागल 80, करवीर 184, पन्हाळा 64, राधानगरी 54, शाहूवाडी 29, शिरोळ 73, नगरपालिका क्षेत्रात 102, कोल्हापुरात 340 तर अन्य 15 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 34 हजार 494 झाली आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लŸबमधून सोमवारी 3 हजार 242 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 790 ा†नगा†टव्ह आहेत. अŸन्टीजेन टेस्टचे 3 हजार 742 अहवाल आले. त्यातील 3 हजार 375 ा†नगा†टव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 140 रिपोर्ट आले. त्यातील 775 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 8 हजार 124 स्वŸब रिपोर्ट आले.

परजिल्हय़ातील तिघांचा तर शहरातील 8 जणांचा कोरोनाने मृत्यू

दरम्यान, सोमवारी कोरोनाने परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये बेळगाव, सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्हय़ातील मृतांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृतांमध्ये फुलेवाडी, राजारामपुरी, साने गुरूजी वसाहत, शिवाजी पेठ, आर. के. नगर भागातील आहेत.

नव्या रूग्णांत घट, सक्रीय रूग्णांत घट
कोरोना रूग्ण 1184 : एकूण : 1,34,494
कोरोनामुक्त 1568 : एकूण : 1,18,159
कोरोना मृत्यू 37 : एकूण मृत्यू : 4205
सक्रीय रूग्ण : 12130

Advertisements

Related Stories

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांबरोबर आज महत्वपूर्ण बैठक

triratna

कोल्हापूर : वसगडेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण

Shankar_P

कोल्हापूर : आरळेतील मारहाण प्रकरणी संशयिताला १३ पर्यंत कोठडी

triratna

राधानगरी तालुक्यात ११९९ होम क्वारंटाईन मुक्त तर ५१२३ होमक्वारंटाईन

triratna

आरळेतील खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

triratna

कणेरी येथे प्रदूषण मुक्त दीपोत्सव साजरा

triratna
error: Content is protected !!