तरुण भारत

छ.राजाराम सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी दिलीपराव पाटील

पुलाची शिरोली / वार्ताहर

छञपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी येथील जेष्ठ संचालक दिलीपराव भगवान पाटील यांची दुसऱ्यांदा सर्वानुमते निवड करण्यात आली. या विशेष निवड सभेच्या अध्यक्षस्थानी उप प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव हे होते.तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

नुतन चेअरमन दिलीप पाटील हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी गेली वीस वर्षे संचालक व एकवेळ चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. यावेळी बोलताना पाटील यांनी सभासद व कारखान्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी प्रयत्न करु. तसेच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असे आश्र्वासन दिले.
जेष्ठ संचालक हरिष चौगले यांनी सुचक तर कुंडलीक चरापले यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे. या विशेष निवड सभेस कारखान्याचे व्हा. चेअरमन वसंत बेनाडे, संचालक माजी आमदार अमल महाडिक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, सल्लागार संचालक पी.जी.मेढे यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : कल्लेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी राज्य शासनातर्फे लागेल ती आर्थिक मदत करणार : मंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde

बीड शेड परिसरातील चार युवकांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : स्वच्छता गृहावर पन्हाळगड, राधानगरी धरणाच्या चित्राने संताप

Abhijeet Shinde

आग्रा ते राजगड गरुडझेप पायी मोहीम

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत गुरूवारपासून ऑनलाईन परीक्षा

Abhijeet Shinde

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकुशल दिव्यांगांना रोजगार हमीचा लाभ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!