तरुण भारत

ड्रिंक्सहून अधिक इंटीरियरची चर्चा

पबमध्ये 20 लाख डॉलर्सच्या नोटांनी सजावट

अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील पेंसाकोलामध्ये मॅकगुएर्स आयरिश पब स्वतःच्या  खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सहून अधिक इंटीरियरवरून चर्चेत असतो. या पबच्या सीलिंगमध्ये खऱया नोटा टांगण्यात आल्या आहेत.

Advertisements

एका अनुमानानुसार पबच्या सीलिंगमध्ये 20 लाख डॉलर्स रकमेच्या नोटा लटकलेल्या आहेत. या पबमध्ये चोरीचे प्रयत्न झाले असले तरीही प्रत्येकवेळा चोर कचाटय़ात सापडला आहे. पबचे मालक सजावटीसाठी ठेवण्यात आलेल्या या नोटांना मालमत्ता मानून रितसर करभरणाही करतात.

हा पब 1977 मध्ये मार्टिन मॅकगुएर आणि त्यांची पत्नी मौली यांनी सुरू केला होता. मॅकगुएर बार सांभाळायचे तर मौली टेबल्स. पबमधील पहिल्या ग्राहकाने मौली यांना एक डॉलरची टिप दिली असता त्यांनी त्यावर तारीख लिहून स्वाक्षरी करून गुडलकच्या स्वरुपात नोट सीलिंगवर लटकविली. तेव्हापासून ही परंपराच ठरली आहे.

15 हजार चौरस फुट क्षेत्रात फैलावलेल्या या पबच्या प्रत्येक सीलिंगवर डॉलर्सच्या नोटा टांगलेल्या आहेत. जागा कमी पडू लागल्याने पबमालकांनी भिंतींवर नोटा चिकटविण्यास सुरुवात केली आहे. पबबाहेरील लोकांसह येथे काम करणाऱया एक कर्मचाऱयाने 5 हजार डॉलर्स चोरण्याचा प्रयत्न केला होता. अनेक लोक येथून डॉलर्स घेऊन जातात. पण या नोटांवर टिपची तारीख लिहिलेली असल्याने त्या वापरता येत नाहीत.

Related Stories

असोगा बंधाऱयाच्या डागडुजीकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Patil_p

कराड विमानतळ कालपासून अंधारात

Patil_p

।। अथ श्रीरामकथा ।।

Patil_p

काश्मीरमधील अनोखे ‘बडा घर’

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 एप्रिल 2020

Patil_p

ऑलिम्पिकपटू सुशील कुमारला अटक

Patil_p
error: Content is protected !!