तरुण भारत

कोल्हापूर : यड्राव येथे चारचाकीच्या धडकेत​ एकाचा मृत्यू

वार्ताहर / यड्राव

इचलकरंजी – जयसिंगपूर रोडवर ​सकाळी​ मानसिंग दिनकर खोत वय ५०, रा. खोतवाडी, ता.हातकणंगले यांना भंडारे पेट्रोलपंपानजीक पाठीमागून ​आलेल्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अज्ञात वाहनचालकावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार गजानन विलास नलगे (रा. खोतवाडी) यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मानसिंग​ खोत हे​ नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी खोतवाडीतून निघाले होते. संगमनगर ते कोंडीग्रे फाटा या मार्गावर​ भंडारे पेट्रोलपंपानजीक आले असता एका भरधाव अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये ते जागीच ठार झाले.​

Advertisements

परंतु वाहन चालकाने गाडी न थांबविता इथून​ पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच खोतवाडी मधील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अज्ञात वाहन चालकाच्या शोधासाठी शहापूर पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध घेत आहेत.

Related Stories

३० लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे ऑनलाईन दर्शन

triratna

आरळेतील खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

triratna

जय शंभुराजे परिवाराच्या मावळ्यांची मुडागडची स्वच्छता मोहीम

triratna

ट्रकची दुचाकीस जोराची धडक,पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी

triratna

पर्यटकांना खुणावतोय पळसंबेचा बावडेकर राजवाडा

triratna

शिरगाव राशिवडे दरम्यान अज्ञाताने लांबवले महिलेचे दागिने

Shankar_P
error: Content is protected !!