तरुण भारत

वड्डी येथील बेपत्ता तरुणाचा विहिरीत सापडला मृतदेह

प्रतिनिधी/मिरज

मिरज तालुक्यातील वड्डी गावातून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा गावातीलच विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रकाश उर्फ दादासा वसंत शिरतोडे (वय 38) असे मृत तरुणाचे नाव आहे. दारु पिऊन तो विहिरीत पडला असल्याचा संशय घटनास्थळी व्यक्त करण्यात आला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला असून, पोलिसात नोंद झाली आहे.

Advertisements

घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, प्रकाश उर्फ दादासो शिरतोडे हा तरुण वड्डी गावातील शांतीनगर भागात राहण्यास होता. त्याला दारुचे व्यसन होते. या व्यवसानाच्या आहारी गेल्याने गेल्या काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. चार दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला. त्याच्या पत्नीने सर्वत्र शोध घेतला असता, तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने मिरज ग्रामीण पोलिसात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. पोलिसांकडूनही त्याचा शोध घेतला जात होता.

सोमवारी दुपारच्या सुमारास गावातील विहिरीत एक मृतदेह तरंगत असताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. याबाबत गावात वार्ता पसरल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली. विहिरीत मृतदेह तरंगत असल्याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदर मृतदेह हा प्रकाश शिरतोडे याचा असल्याचे स्पष्ट झाले. घरातून बेपत्ता झाल्यानंतर दारुच्या नशेत तो विहिरीत पडला असावा, असा संशय घटनास्थळी व्यक्त करण्यात येत होता.

Related Stories

‘वस्त्रोद्योगाच्या प्रलंबीत मागण्या मार्गी लावा’

triratna

सांगली : राजू शेट्टी यांचे दूध आंदोलन म्हणजे मॅचफिक्सिंग

triratna

शिराळा शहरात शंभर टक्के लॉकडाऊन: पोलीस प्रशासनाकडून तंतोतंत नियोजन

Shankar_P

सांगली जिल्ह्याला दिलासा, कोरोनामुक्त १७९३

triratna

काळ्या कोळशातून फुलतो त्यांचा संसार ! ….

triratna

पुणे पदवीधरसाठी रयत क्रांतीतून डॉ. चौगुले यांना उमेदवारी

triratna
error: Content is protected !!