तरुण भारत

डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे वाढली चिंता

मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा प्रभाव न होण्याची भीती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोनाच्या दुसऱया लाटेत देशात मोठी हानी घडवून आणणारा डेल्टा व्हेरियंट आता अधिक धोकादायक डेल्टा प्लसमध्ये बदलला आहे. कोरोनाबाधितांना देण्यात येणारी मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल या व्हेरियंटवर निष्प्रभ ठरू शकते अशी भीती वैज्ञानिकांना आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेलला मे महिन्याच्या प्रारंभी आपत्कालीन वापराची अनुमती मिळाली होती.

ब्रिटनची आरोग्य संस्था पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार (पीएचई) डेल्टा व्हेरियंटचे 63 जीनोम नव्या के417एन म्युटेशनसोबत समोर आले आहेत. पीएचईनुसार डेल्टा व्हेरियंटमध्ये बदलांच्या नियमित तपासणीदरम्यान डेल्टा प्लसचा थांगपत्ता लागला आहे. कोविड व्हेरियंट्सवर पीएचईच्या नव्या अहवालानुसार भारतात 7 जूनपर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंटचे 6 रुग्ण सापडले होते.

के417एन म्युटेशनमध्ये अँटीबॉडीज कॉकटेलच्या विरोधात रेजिस्टेंट होण्याचे पुरावे मिळाले असल्याने चिंता वाढली आहे. भारतात के417एन म्युटेशनचा फैलाव अधिक नसल्याचे दिल्लीच्या इन्स्टीटय़ूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे डॉ. विनोद स्केरिया यांनी म्हटले आहे.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल कैसिरिविमॅब आणि इम्डेविमॅबद्वारे तयार करण्यात आले आहे. सिप्ला आणि रोश इंडिया या औषध कंपन्यांनी याची निर्मिती केली आहे. भारतात कोरोनावरील उपचारात आपत्कालीन वापरासाठी या औषधाला मंजुरी मिळाली आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघात आपत्कालीनक वापरासाठी देण्यात आलेल्या डाटाच्या आधारावर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स ऑर्गनायजेशनकडून मंजुरी मिळाली आहे.

Related Stories

शेतकऱयांचे मन वळवण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न

Patil_p

तिसऱया फेरीतही आनंदचा पराभव

Patil_p

पंजाबमध्ये कोरोना रुग्णांना आता घरपोच मिळणार ऑक्सिजन सिलिंडर

pradnya p

दिलासादायक : कोरोनामुक्ती दरात भारत अव्वल स्थानी

pradnya p

दिल्लीतील सीआरपीएफच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा, मुख्यालय सील

pradnya p

काँग्रेस केंद्र सरकारला घेरणार

datta jadhav
error: Content is protected !!