तरुण भारत

राम मंदिर न्यासावर भूमी घोटाळ्याचा आरोप

अयोध्या / वृत्तसंस्था

अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदिर निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यासावर आम आदमी पक्षाने भूमी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या पक्षाचे संसद सदस्य संजय सिंग आणि समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडे यांनी न्यासावर हा आरोप केला. मात्र, न्यासाने आरोप स्पष्टपणे नाकारले असून विश्व हिंदू परिषदेने आरोपकर्त्यांवर मानहानीची कार्यवाही करण्याचे संकेत दिले असून केवळ राम मंदिर निर्मिती कार्यात अडथळा आणण्याच्या दृष्टीने हा आरोप होत असल्याचे प्रतिपादन केले.

Advertisements

राम मंदिराच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे परिसरातील काही भूखंड न्यासाने काही काळापूर्वी त्यांच्या मालकांकडून विकत घेतले होते. अन्य लोकांनी याच भागात त्याच काळात भूमी विकत घेतली होती, तिचा दर 2 कोटी रुपये होता. परंतू न्यासाने याच दराची भूमी 18 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप संजय सिंग व पांडे यांनी केला होता. काही कागदपत्रही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवत त्यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

व्यवहार कसा झाला.

या व्यवहाराचे स्पष्टीकरण न्यास आणि विश्व हिंदू परिषदेने दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या व्यवहारात एक रूपयाचीही रक्कम रोख दिली गेलेली नाही. सर्व व्यवहार चेकने आणि बँकेच्या माध्यमातून झाला आहे. न्यासाने जी भूमी विकत घेतली तिचे मालक कुसूम पाठक आणि हरिष पाठक हे आहेत. या दोघांनी ही भूमी अनेक वर्षांपूर्वी दोन कोटी रूपयांचा विक्री करार (ऍग्रीमेंट टू सेल) करून सुल्तान अन्सारी यांच्याकडून घेतली होती. त्यावेळी तिचा दर 2 कोटी होता.

ज्यावेळी न्यासाने ही भूमी विकत घेण्यासाठी पाठक यांना प्रस्ताव दिला, तेव्हा उत्तर प्रदेश सरकारने या भूमीची किंमत 18.5 कोटी रूपयांपर्यंत वाढविली होती व तेवढय़ा रकमेवर मुद्रांक शुल्क (स्टँप डय़ूटी) लावलेली होती. त्यामुळे न्यासाला हा भूखंड तेवढय़ा किमतीला घ्यावा लागला. न्यासाचा व्यवहार होण्यासाठी कुसूम पाठक व हरिष पाठक यांनी सुल्तान अन्सारी यांच्याशी कराराप्रमाणे ठरलेल्या रकमेला व्यवहार पूर्ण करून खरेदीपत्र केले. कारण खरेदी पत्र केल्याखेरीज न्यासाला भूमी विकणे त्यांना शक्य नव्हते. ही वस्तुस्थिती लक्षात घेता या व्यवहारात कोणताही घोटाळा नाही हे स्पष्ट होते. मात्र राममंदिराचे विरोधक हेपुपुरस्सर घोटाळय़ाचा आरोप करून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रत्यारोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. तसेच संजय सिंग व पवन पांडे यांना न्यायालयात खेचण्याची तयारी चालविली आहे.

Related Stories

‘फतव्यां’ना न घाबरणाऱ्या रसीद जहाँ

Patil_p

‘बजाज ऑटो’ची धुरा निरज बजाज यांच्याकडे

Patil_p

जोधपूर जिल्हय़ामधील स्थिती अधिक भयावह

Patil_p

दिल्लीत देशातील पहिली प्लाझ्मा बँक सुरू होणार

Patil_p

राज्यात सोमवारी 14 नवे रुग्ण

Patil_p

वृत्तपत्र कागदावरील आयात शुल्क हटवा

Patil_p
error: Content is protected !!