तरुण भारत

जोकोविचकडून युवकाला जेतेपद मिळविलेली रॅकेट भेट

वृत्तसंस्था/ पॅरीस

सर्बियाचा टॉप सीडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने रविवारी येथे पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचे जेतेपद पटकाविले. या अंतिम सामन्यावेळी टेनिस कोर्टच्या शेजारी हा सामना पाहत असलेल्या एका युवकाला जोकोविचने या सामन्यात वापरलेली टेनिस रॅकेट भेट म्हणून दिली. या अंतिम सामन्यावेळी सदर युवकाने आपल्याला टेनिसचे योग्य डावपेचाच्या सूचना देत मार्गदर्शन केले होते, असे जोकोविचने सांगितले.

Advertisements

जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील 19 वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकाविले. 34 वर्षीय जोकोविचने रविवारी पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात ग्रीकच्या सिटसिपेसचा पराभव केला. ही अंतिम लढत चार तास 11 मिनिटे चालली होती. या अंतिम लढतीवेळी या युवकाकडून मला योग्य डावपेचाचे मार्गदर्शन मिळाल्याने आपल्याला हा विजय मिळविता आला. सदर युवकाच्या प्रोत्साहनामुळे मी ही स्पर्धा जिंकू शकलो, असे जोकोविचने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. असंख्य टेनिस शौकिनांच्या सहकाऱयांमुळे मला हे यश मिळविता आले त्याबद्दल जोकोव्हिकने टेनिस शौकिनांचे आभार मानले. त्याच्याकडून रॅकेट भेटीदाखल मिळाल्यानंतर त्या युवकाच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. त्याने जल्लोष करीत आनंद साजरा केला.

Related Stories

अमेरिकेच्या मॅक्लॉलिनचा नवा विश्वविक्रम

Patil_p

नीरज चोप्रा खेलरत्नसाठी नामांकित

Patil_p

नेमबाजांसाठी सक्तीचे शिबिर लांबणीवर

Patil_p

ऑलिंपिक बहिष्कार विरोधात बॅच यांचा इशारा

Patil_p

क्रिकेट ऑस्टेलियाच्या सीईओची उचलबांगडी ?

Patil_p

Patil_p
error: Content is protected !!