तरुण भारत

ऑस्ट्रियाचा 1990 नंतर प्रथमच संस्मरणीय विजय

बुचारेस्ट-रोमानिया / वृत्तसंस्था

ऑस्ट्रियाने युरो स्पर्धेत 7 सामन्यानंतर पहिलाच विजय नेंदवला. युरोपियन चॅम्पियनशिप पदार्पण करणाऱया उत्तर मॅसेडोनियाविरुद्ध त्यांनी 3-1 असे सहज वर्चस्व नोंदवले. एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेत ऑस्ट्रियाचा हा 1990 नंतरचा पहिलाच विजय आहे. 1990 विश्वचषकात त्यांनी यापूर्वी शेवटचा देदीप्यमान विजय नोंदवला होता.

Advertisements

बदली खेळाडू मायकल ग्रेगोरित्स्च व मार्को ऍर्नायुतोव्हिक यांनी केलेल्या ‘लेट गोल’चा ऑस्ट्रियाच्या विजयात मोलाचा वाटा राहिला. ग्रेगोरित्स्चने 78 व्या मिनिटाला डेव्हिड अलाबाच्या क्रॉसवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला तर 89 व्या मिनिटाला मार्कोने संघाचा तिसरा गोल केला.

‘आमचे खेळाडू पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळले. खऱया अर्थाने त्यांनी आज इतिहास रचला. बदली खेळाडूंनी या सामन्यात दिलेले योगदान विशेष महत्त्वाचे ठरले’, असे ऑस्ट्रियाचे प्रशिक्षक प्रँको माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ऑस्ट्रियाने या लढतीत अनुभवी अलाबाला सेंट्रल डिफेन्समध्ये उतरवले आणि त्यानेही बॉल पझेशनच्या आघाडीवर वर्चस्व गाजवून देत व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. अर्थात, त्याला निर्णायक ब्रेकथू मिळवून देण्यात जे अपयश येत होते, त्याची भरपाई स्टेफन लेनरने केली. लेनरने मार्सल सॅबित्झरच्या पासवर गोलरक्षक स्टोल दिमित्रेवस्कीचा बचाव भेदण्यात यश मिळवले होते.

या स्पर्धेत सर्वात निचांकी मानांकन असलेल्या उत्तर मॅसेडोनिया संघाने 10 मिनिटांच्या अंतराने खाते उघडत सामन्यात बरोबरीही साधली. पण, उत्तरार्धात पुन्हा त्यांना बरोबरी गमवावी लागली. गोरानने यावेळी मॅसेडोनियाला बरोबरी साधून दिली होती. तो युरो स्पर्धेत गोल नोंदवणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडूही ठरला. आता पुढील फेरीत ऑस्ट्रियाची लढत हॉलंडविरुद्ध गुरुवारी होईल तर उत्तर मॅसेडोनियाचा संघ युक्रेनविरुद्ध पुढील लढतीसाठी येथेच थांबणार आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियनप्रमाणे विराटही सर्वाधिक परिपूर्ण खेळाडू

Patil_p

भारतीय महिलांसाठी आजची लढत औपचारिक

Patil_p

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आता 2021 च्या अखेरीस

Patil_p

आयपीएल स्पर्धेत कोठेही खेळण्यास भुवनेश्वर सज्ज

Patil_p

आयपीएल लिलावासाठी अर्जुन तेंडुलकर, श्रीशांत उपलब्ध

Patil_p

भारतीय प्रशिक्षकासाठी ऑनलाईन सराव शिबीर

Patil_p
error: Content is protected !!