तरुण भारत

होय, मी चीट केले! आनंदला पराभूत करणाऱया अब्जाधीशाची कबुली!

चेन्नई / वृत्तसंस्था

स्टॉक ब्रोकिंग कंपनी झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामतनी रविवारी प्रदर्शनीय बुद्धिबळ लढतीत पाचवेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला पराभवाचा धक्का देत एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र, या सामन्याला 24 तास उलटतात न उलटतात तोच दस्तुरखुद्द निखिल कामतनी आपण लढतीत चिटिंग केले असून संगणकाची मदत घेऊन सर्व चाली रचल्या होत्या, अशी जाहीर कबुली ट्वीटरवर दिली.

Advertisements

‘विशी सरांना मी बुद्धिबळात हरवले, यावर अनेकांचा विश्वास बसत नसेल. 100 मीटर्स शर्यतीत अचानक उतरुन युसेन बोल्टला हरवण्यासारखे हे होते. पण, या सामन्यादरम्यान मी चिटिंग केले. संगणकाची मदत घेतली आणि काही तज्ञही माझी मदत करत होते. घडल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो’, असे निखिलनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे सचिव भारत चौहान यांनी एखाद्या प्रदर्शनीय स्पर्धेतही असा प्रकार घडणे दुर्दैवी असल्याचे मत नोंदवले. ‘सामन्यात कोणीही संगणकाची मदत घ्यावी, हे चुकीचे आहे. जिथे खेळाडू खेळत असतात, तिथे आम्ही कॅमेरे बसवलेले असतात आणि असे गैरप्रकार थोपवण्यासाठी 3 ग्रँडमास्टर्स, 2 खेळाडूंची फेयर प्ले कमिटी देखील असते’, असे ते म्हणाले.

कोरोनाच्या अस्मानी संकटात होरपळून निघालेल्या कुटुंबियांना मदत करावी, या संकटाविरुद्ध लढण्यासाठी पाठबळ द्यावे, या उद्देशाने ही ऑनलाईन स्पर्धा भरवली गेली होती व यातून 6.7 लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. ही मदत अक्षयपत्र फाऊंडेशनकडे सुपूर्द केली जाणार आहे. सिनेमा, क्रिकेट, संगीत व बिझनेस अशा विविध क्षेत्रातील 10 दिग्गजांनी आनंदविरुद्ध या प्रदर्शनीय स्पर्धेत सहभाग घेतला होता.

Related Stories

यू-19 विश्वचषक : भारत-जपान लढत आज

Patil_p

न्यूझीलंडला फलंदाजीतील खराब फॉर्मची चिंता

Patil_p

क्रिकेटपटू चेतन साकारियाला पितृशोक

Patil_p

मुंबई इंडियन्सची अंतिम फेरीत धडक

Patil_p

पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व

Patil_p

महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पाच महिलांचे अर्ज

Amit Kulkarni
error: Content is protected !!