तरुण भारत

पाठलाग करुन पकडणाऱया जवानावर चोरटय़ाचा हल्ला

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथे एका जवानाच्या घरात बेडरुमच्या खिडकीतून हात घालून कपाट उघडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा रंगेहाथ सापडला. त्याला हटकल्याने तो पळून जावू लागल्यावर जवानाने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. यावेळी चोरटय़ाने लोखंडी बार व दगडाने जवानाच्या पायावर मारुन जवानाला जखमी केल्याची घटना घडली.

Advertisements

दरम्यान, याप्रकरणी अक्षय संभाजी आढाव (रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 13 रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या मदनराव नवनाथ शिंदे (वय 38, रा. क्षेत्रमाहुली) यांच्या घराच्या बेडरुमच्या खिडकीतून हात घालून अक्षय आढाव चोरी करत होता. ही बाब जवान शिंदे यांनी पाहताच तो पळून जावू लागला. शिंदे यांनी पाठलाग करुन त्याला पकडले असता त्याने शिंदे यांच्या पायावर लोखंडी बार, दगड मारुन त्यांना जखमी केले आहे. या घटनेनंतर तो तेथून पळून गेला.

दरम्यान, अक्षय आढाव याने क्षेत्रमाहुली येथील संदीप विकासराव पंडित यांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत मदनराव शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर आढाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस नाईक मोरे करत आहेत.

Related Stories

सातारा : किसनवीर साखर कारखान्याच्या सभासद, शेतकरी, कामगारांच्या गळ्याचा आर्थिक फास सोडवा

triratna

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक

triratna

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घ्यावीत

Patil_p

मुख्यमंत्रीसाहेब, सरकार निर्दयी कसे झाले ?

triratna

जिल्हाधिकारी चषकास प्रारंभ

Patil_p

सातारा : गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना चार दिवसांची कोठडी

Shankar_P
error: Content is protected !!