तरुण भारत

चिखली वास्कोतील महामार्गावर वृक्ष कोसळला, वाहतुक अन्य मार्गांवर वळवली

प्रतिनिधी / वास्को

वास्कोतील चिखली नाक्यापासून काही अंतरावरील महामार्गावर सोमवारी सकाळी वृक्ष कोसळला. सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही हानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे वास्कोहून चिखली व कुठ्ठाळीच्या दिशेने जाणारी वाहने अडकून पडल्याने ही वाहतुक विमानतळ मार्गावरून वळवण्यात आली.

Advertisements

चिखलीतील महामार्गावर वृक्ष कोसळण्याची ही घटना सकाळी सातच्या सुमारास घडली. एकाच वेळी या ठिकाणी दोन वृक्ष कोसळले. ऐरव्ही महामार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. सुदैवाने हे वृक्ष कोसळताना कोणतीही हानी झाली नाही. वास्कोतील शासकीय अग्नीशामक दलाला या घटनेसंबंधी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन या रस्त्यांवरील वृक्ष हटवण्याचे काम सुरू केले. या वृक्षामुळे चिखली, सांकवाळ, कुठ्ठाळी व पणजीच्या दिशेने जाणारी वाहने अडकून पडल्याने ही वाहने दाबोळी विमानतळ मार्गे वळवण्यात आली. तसेच वास्को शहराच्या दिशेने येणारी वाहनेही कुठ्ठाळी नाक्यावरून वेर्णाच्या दिशेने तसेच सांकवाळ, दाबोळीच्या दिशेने वळवण्यात आली. या रस्त्यावरील वृक्षांचे अडथळे  दूर करण्यासाठी अग्नीशामक दलाला चार तास कष्ट घ्यावे लागले. वास्को शहर व परीसरात सोमवारी दिवसभरात समाधानकारक पाऊस पडला. नुकसानीच्या घटना कुठेही घडल्या नाहीत.

Related Stories

‘संजय न्यूज न्यूक’कडून पत्रकारांना मास्क, अन्य साहित्य

Amit Kulkarni

कोरोनाचे 3 बळी, 117 नवे रुग्ण

Omkar B

विनोद सतकळकर यांना यंदाचा कौशल्यचार्य पुरस्कार जाहीर

Amit Kulkarni

राजविद्या केंद्रातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा

Omkar B

गणेश शेटकर यांचे निधन

Amit Kulkarni

समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा ‘व्हॅलेंटाईन डे’

Shankar_P
error: Content is protected !!