तरुण भारत

धक्कादायक : निवृत्त पोलिसाकडून स्वतःच्या दोन मुलांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झडल्याची घटना सोमवारी घडली आहे. या घटनेत  एकाचा खून केला आहे. तर दुसरा मुलगा जखमी झाला आहे. ऐरोली सेक्टर 2 मध्ये सदरचा प्रकार घडला आहे.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली सेक्टर 2 मध्ये भगवान पाटील हे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी राहत होते. शिघ्रकोपी असलेल्या भगवान पाटील यांच्या स्वभावाला कंटाळून त्यांची दोन्ही मुले वेगळी राहत होती. शिल्लक गोष्टींवरून भगवान पाटील घरातील बायको पोरांबरोबर भांडण काढत असल्याने त्यांना सर्वजन वैतागले होते. अखेर भगवान पाटील यांच्या स्वभावात काहीच फरक पडत नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्यापासून वेगळे राहण्यास सुरुवात केली होती. 


गाडीचा इन्शुरन्स भरण्यासाठी मुलांनी वडील भगवान पाटील यांना सांगितले असता यावरून त्यांनी मुलांशी हुज्जत घातली होती. संध्याकाळी दोन्ही मुलांना त्यांनी घरी बोलवले होते. घरात इन्शुरन्स भरण्यावरून तिघांमध्ये बातचीत झाली असता शिघ्रकोपी असलेल्या भगवान पाटील यांना राग अनावर झाला. मुलगा विजय आणि सुजय यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी ऐकले नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी असलेल्या रिव्हॉल्वरमधून भगवान पाटील याने पाच गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या विजय पाटील या मुलाच्या पोटात, खांद्यावर आणि हाताला लागल्या. तर दुसरा मुलगा सुजय पाटील याच्या अंगाला चिटकून गोळी निघून गेली.


विजय पाटील याला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. घरातून बाहेर येताच तो रस्त्यावर पडल्याने त्याला त्वरीत ऐरोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुदैवाने दुसरा मुलगा सुजय पाटील याला गोळी चाटून गेली असल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान, या प्रकरणी आरोपी वडील भगवान पाटील याला रबाले पोलिसांनी अटक केली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.  

Related Stories

आपल्या कलाकृतीतून ‘कोरोनाला फटकावण्याचा संदेश’ देत सचिनच्या चाहत्याने दिल्या सचिनला शुभेच्छा!

prashant_c

‘रिलायन्स’च्या बैठकीत अनेक नव्या योजनांची घोषणा

Amit Kulkarni

पंजाबमध्ये 15 जूनपर्यंत वाढविले कोरोना निर्बंध; मात्र उद्यापासून काही प्रमाणात सूट

pradnya p

जीएसटी रिटर्न भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

datta jadhav

सुरीनामच्या राष्ट्रपतींनी वेदमंत्राचा उच्चार करत घेतली शपथ

datta jadhav

विठोबाच्या मूर्तीस लवकरच वज्रलेप

Shankar_P
error: Content is protected !!