तरुण भारत

कॉन्स्टेबल परीक्षेत बोगस विद्यार्थी : 61 जणांना अटक

सीआयडीची राज्यभरात कारवाई : 5 कॉन्स्टेबल सेवेतून बडतर्फ

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

मागील वर्षी पार पडलेल्या कॉन्स्टेबल परीक्षेत बोगस उमेदवार बसविण्यात आल्याप्रकरणी सीआयडी पोलिसांनी आतापर्यंत 61 जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणात सहभागी झालेल्या पाच कॉन्स्टेबलना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये राज्यात कॉन्स्टेबल पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या नावे बोगस उमेदवार परीक्षेला बसले होते. हा प्रकार उघडकीस येताच राज्यातील विविध पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. बेंगळूरमध्ये 11, बेळगाव जिल्हय़ात 5 यासह एकूण 21 प्रकरणांची नोंद झाली होती. राज्य सरकारने हे प्रकरणी तपासासाठी सीआयडीकडे सोपविले होते.

तपासादरम्यान सीआयडी पोलिसांनी गोकाकमधील चार जणांसह एकूण 61 जणांना अटक केली आहे. उमेदवारांच्या नावे परीक्षा दिलेल्या 5 कॉन्स्टेबलना सेवेतून डच्चू देण्यात आला आहे. शिवाय त्यांना सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

अटकेतील आरोपी उमेदवारांच्या आधारकार्डावरील फोटो बदलत होते. गोकाकमधील एका फोटो स्टुडियोमध्ये हा गैरप्रकार करण्यात आला होता. तेथे परीक्षेसाठी बोगस कागदपत्रेही तयार करण्यात आल्याचे तपासावेळी आढळून आल्याचे समजते. अटकेतील आरोपींकडून 1.54 लाख रुपये, दोन कार, कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

Related Stories

कर्नाटक : परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशी संप सुरूच

triratna

उत्पादने निर्यात करणाऱया कंपन्या सुरू करण्यास हिरवा कंदील

Amit Kulkarni

२२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; शाळा सात दिवस बंद

Shankar_P

शेतकऱयांच्या मदतीला ‘ऍग्री वॉररुम’

Amit Kulkarni

राज्यात सोमवारपासून लॉकडाऊन

Patil_p

बेंगळूर: “बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करा”

triratna
error: Content is protected !!