तरुण भारत

घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्टतर्फे आर. के. कुटे यांना श्रद्धांजली

प्रतिनिधी /बेळगाव

घुमटमाळ मारुती मंदिर, हिंदवाडीचे माजी अध्यक्ष व विद्यमान ट्रस्टी, निवृत्त प्राचार्य आर. के. कुट्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्याबद्दल त्यांना घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्टच्यावतीने बी. के. बांगडी सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनंत लाड होते.

Advertisements

प्रारंभी अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून कुट्रे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सर्व ट्रस्टींनी फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी गोपाळ बिर्जे यांनी कुट्रे सरांच्या कार्याचा आढावा घेतला. रामभाऊ कुट्रे यांनी ज्या-ज्या संस्थांमध्ये जिद्दीने हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत कधीच शांत बसले नाहीत, असे बिर्जे म्हणाले.

मराठा समाज सुधारणा मंडळाची इमारत उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, याची आठवण माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी करून दिली. याचबरोबर रामभाऊ कुट्रे यांनी मुख्याध्यापक म्हणून केलेल्या कार्याचाही आढावा घेतला. अनंत लाड यांनीही आपले विचार मांडले. सुनील चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत बांडगी, ट्रस्टी संभाजी चव्हाण, चंद्रकांत पवार, रघुनाथ बांडगी, बाबुराव पाटील, मोहन मेलगे, विक्रम चिंडक, प्रकाश महेश्वरी, सेपेटरी कुलदीप भेकणे, बाळू किल्लेकर, उदय कुट्रे आदी उपस्थित होते.

Related Stories

वाहतूक नियमांबाबत जागृती करणे अत्यावश्यक

Patil_p

मराठी साहित्य संमेलनांवरील निर्बंध घालणे थांबवा

Patil_p

आरपीडी रोडवरील डेकोरेटिव्ह दिव्यांची दुरवस्था

Amit Kulkarni

परवानगीअभावी डॉल्बीचालक अद्यापही अडचणीत

Omkar B

बेळगावला आता झिकाचा धोका ; अलर्ट जारी

Amit Kulkarni

पहिला मार्गशीर्ष गुरुवार भक्तिमय वातावरणात

Patil_p
error: Content is protected !!