तरुण भारत

जितो लेडिज विंगतर्फे ‘पहचान’ वेबिनार

प्रतिनिधी / बेळगाव

जितो लेडिज विंगतर्फे शनिवारी ‘पहचान’ या विषयावर वेबिनार पार पडले. यामध्ये कर्नाटक, केरळ व गोवा विभागातील उल्लेखनिय कार्य करणाऱया महिलांची निवड करण्यात आली. त्यामध्ये बेळगावच्या अरुणा शाह, नागरत्ना, होस्पेटच्या सुनीता पाटील व मधू जैन यांची ‘स्टार अचिव्हर’ म्हणून निवड केली.

Advertisements

अरुणा शाह यांनी पतीच्या आजारपणामुळे बंद पडलेला ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय पुन्हा कसा उभा केला हे सांगतानाच आजही या क्षेत्रात महिलांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट केले. नागरत्ना यांनी एचआयव्ही बाधित मुलांसाठी काम करण्याची सुरुवात कशी झाली याची माहिती दिली. बेळगावच्याच व सध्या होस्पेटमध्ये असणाऱया सुनीता पाटील यांनी तेथील महिलांना कार्यरत केले. आणि 80 टक्के महिलांना स्वतःच्याच कारखान्यात नोकरी दिली.

होस्पेट येथील मधू जैन यांनी रेल्वेरूळावर पडल्याने हात गमवावा लागला तरी मृत्यूशी झुंज देत अपंगत्वाचा बाऊ न करता शिक्षिका व प्रेरणादायी वक्त्या हा प्रवास उलगडला. कोणतेही काम लहान-मोठे नसते. श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, असे अरुणा शाह यांनी सांगितले. वेबिनारसाठी जितोच्या समन्वयक भारती हरदी यांनी पुढाकार घेतला.

Related Stories

‘हालशुगर’ सहा लाख टन ऊस गाळप करणार

Patil_p

बेळगाव शहरात आणखी तीन बळी

Patil_p

लोकमान्यतर्फे महेश फौंडेशनला ब्लँकेटचे वाटप

Amit Kulkarni

आधारकार्डच्या सक्तीमुळे ई-केवायसी कामात अडथळे

Amit Kulkarni

जलवाहिन्यांमुळे सांडपाणी वाहण्यास अडथळा

Amit Kulkarni

उन्नतीतर्फे संक्रांतीनिमित्त विक्री मेळावा

Patil_p
error: Content is protected !!