तरुण भारत

बांधकाम क्षेत्र सापडले आर्थिक कोंडीत

सरकारने कोंडी दूर करण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान देणारे बांधकाम क्षेत्र सध्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत. सरकारने ही कोंडी लवकरात लवकर दूर करावी. अन्यथा परवडणारे घर हे पंतप्रधानांचे स्वप्न केवळ दिवा स्वप्नच राहिल, अशा आशयाचे निवेदन कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱयांमार्फत केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुश गोयल यांना पाठविले आहे. याच निवेदनाची प्रत त्यांनी राज्याचे अवजड, मध्यम व लघुउद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनाही पाठविली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून लॉकडाऊन करणे अपरिहार्य झाले आहे. तथापि, याचा जबर फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. बांधकाम क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा उचलते. अडीचशेहून अधिक उद्योग व्यवसाय या क्षेत्राशी थेट निगडीत आहेत. मात्र गेल्या चार वर्षांत सिमेंट आणि स्टीलचे दर अनुक्रमे 40 आणि 50 टक्क्मयाने वाढले. त्यात लॉकडाऊनचा फटका बसला आणि बांधकाम क्षेत्राचा कणाच मोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना परवडणारे घर ही संकल्पना मांडली आहे. परंतु बांधकाम साहित्यांचे दर अशा पध्दतीने वाढल्यास या क्षेत्राला तग धरुन राहणे कठीण होणार आहे. तेंव्हा लवकरात लवकर या समस्येमध्ये लक्ष घालून तिचे निराकरण करुन सरकारने बांधकाम व्यवसायाला दिलासा द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर अध्यक्ष पी. एस. हिरेमठ, सचिव विजय के. व खजिनदार एस. ए. पाटील आणि पदाधिकाऱयांच्या सह्या आहेत.

Related Stories

गणित विषयाच्या पेपरला 269 विद्यार्थ्यांनी मारली दांडी

Patil_p

सीमावासीय मागासवर्गीयांना महाराष्ट्रात आरक्षण द्या

Patil_p

पावसाची भीषण खेळी, घेतला 7 जणांचा बळी

Patil_p

रविवारीही शहर परिसरात शांतता

Amit Kulkarni

जिह्यात तलावांच्या माध्यमातून पाणीपातळी वाढविण्याचे प्रयत्न

Omkar B

रोटे. शरद पै यांचा विशेष पुरस्काराने गौरव

Rohan_P
error: Content is protected !!