तरुण भारत

नियम मोडणाऱया आस्थापनांवर कारवाई

काकती-कॅम्प पोलिसांकडून एफआयआर दाखल

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कोरोना महामारी थोपविण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपली आस्थापने उघडी ठेवून नियम मोडणाऱयांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. काकती व कॅम्प पोलिसांनी धाबा, किराणा दुकान व हेअरकटींग सलूनवर कारवाई केली आहे.

काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी हंदिगनूरजवळील गावकरी धाब्यावर एफआयआर दाखल केला आहे. अतिवाड येथील हुवाप्पा सुतार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काकती येथील महालक्ष्मी जनरल स्टोअर्सचे भीमसेन कुंभार यांच्यावर एफआयआर दाखल करून किराणा दुकानातून 4 लिटर बेकायदा मद्यही जप्त करण्यात आले आहे.

कॅम्प पोलिसांनी कट ऍण्ड क्मयुट या हेअरकटींग सलूनवर कारवाई केली आहे. मोहम्मद सनावर (मूळचा रा. मुज्जफरनगर-दिल्ली, सध्या रा. वैभवनगर), वासिम बेपारी (रा. कॅम्प) या दोघा जणांवर एफआयआर दाखल केले आहेत. कर्नाटक ऍपीडेमीक डिसीज ऍक्ट-2020 कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.

Related Stories

रविवारी 424 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

अशोक चौक-आरटीओ सर्कल मार्गावर वाहतूक कोंडी

Omkar B

समान न्यायासाठी आता ई-लोकअदालत

Patil_p

टिळकवाडीतील भाजी मंडई भुईसपाट

tarunbharat

पर्यटकांअभावी बुद्धगयाची स्थिती गंभीर

Omkar B

बिर्जे कुटुंबीयांकडून गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Amit Kulkarni
error: Content is protected !!