तरुण भारत

ब्लॅक फंगस रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य खात्यासमोर आव्हान

जिल्हय़ात ब्लॅक फंगसचे 210 रुग्ण : उपचार करण्यात बिम्स ठरतेय असमर्थ

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना पाठोपाठ ब्लॅक फंगसची डोकेदुखी वाढली आहे. दुर्दैवाने बेळगाव जिल्हय़ात ब्लॅक फंगस बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा आरोग्य खात्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. शनिवारी रात्रीपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्हय़ात ब्लॅक फंगसचे 210 रुग्ण आहेत. त्यापैकी 100 जणांना बिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु कोरोनाप्रमाणेच ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार करण्याबाबत बिम्सची यंत्रणा सक्षम नाही, अशा तक्रारी होत आहेत.

बिम्समध्ये ब्लॅक फंगसवर उपचार करणारी आधुनिक उपकरणे नाहीतच, शिवाय तज्ञ डॉक्टरांचीही कमतरता आहे. या रोगाला सामोरे जाण्याची पूर्वतयारीसुद्धा केली गेली नाही. इतर राज्यांमध्ये ब्लॅक फंगस उपचार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. पण बेळगाव अद्याप मागे आहे, अशी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची तक्रार आहे.

दरम्यान, बिम्समध्ये दाखल केलेल्या 100 रुग्णांपैकी 60 हून अधिक जणांना शस्त्रक्रियेची गरज आहे. त्या तुलनेत ही शस्त्रक्रिया करणारे बिम्समध्ये फक्त दोनच डॉक्टर आहेत. त्यामुळे या डॉक्टरांवरही ताण आला आहे. औषधांचीही कमतरता आहे. परिणामी रुग्णांना खासगी हॉस्पिटलचे दरवाजे ठोठावावे लागत आहेत. मात्र, गरीब रुग्णांना खासगी हॉस्पिटल्स परवडण्याजोगी नाहीत.

पुढील आठवडय़ापर्यंत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध होणार

बिम्समध्ये सध्या डॉ. सतीश बागेवाडी व डॉ. शिरीष पाटील हे रुग्णांवर उपचार करीत आहेत. लवकरच म्हणजे मंगळवारपर्यंत अन्य दोन डॉक्टर रुजू होण्याची शक्मयता आहे. शिवाय पुढील आठवडय़ापर्यंत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध होणार आहेत. सोमवारपर्यंत 155 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. काही रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या म्हणजेच सोमवारी 95 रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

-डॉ. के. सुधाकर, सिव्हिल सर्जन, बिम्स

Related Stories

काकती येथे ऊस घेऊन जाणारा ट्रक्टर पलटी

Patil_p

अश्विनी शिंदे यांना पीएचडी प्रदान

Patil_p

लोकापूर – धारवाड व्हाया सौंदत्ती रेल्वे मार्गाला मंजुरी द्या

Patil_p

अरगन तलावानजीकच्या गांधी पुतळय़ाची स्वच्छता

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमध्येच कोविडच्या नियमांचा फज्जा

Amit Kulkarni

धामणे रस्त्यावरील बळ्ळारी पुलाजवळ मारली चर

Patil_p
error: Content is protected !!