तरुण भारत

ऑनलाईन लग्नाचा फंडा, घातला लाखाचा गंडा!

विवाहासाठी इच्छुक युवकाची वेबसाईटवरून फसवणूक : सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

विवाह विषयक वेबसाईटमध्ये खोटी माहिती अपलोड करुन वराला फसविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. बेळगाव येथील विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुणाला एका कथित वधूने 1 लाख 17 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सीईएन (सायबर, एकॉनॉमिक, नॉर्कोटिक्स) पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात साऱयाच गोष्टी बदलत आहेत. पूर्वी लग्न ठरविताना वधू-वर सूचक केंद्रांची मदत घेतली जायची आता तर अनेक मॅट्रीमोनियल वेबसाईट्स आहेत. या साईटवर लग्नासाठी इच्छुक असणाऱया लाखो तरुण-तरुणींची माहिती असते. कोणी याचा वापर खऱया अर्थाने लग्नासाठी करतात तर आणखी कोणी फसवणुकीसाठीही या वेबसाईटचा वापर करतात.

बेळगाव येथील एका तरुणाला मॅट्रीमोनियल वेबसाईटवर एका वधूचा परिचय झाला. मोबाईल क्रमांक मिळवून दोघे एकमेकांशी संपर्क करु लागले. मुलगी बघण्यासाठी आम्ही येणार आहे, असा निरोपही वराकडून देण्यात आला. त्याआधी व्हॉट्सऍपवर चॅटिंग व कॉलिंगही सुरू झाले होते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरताच वधूकडून मागणी आली. आमची परिस्थिती बरी नाही. माझ्या अकाऊंटमध्ये थोडे पैसे टाका, असे सांगत तिने 1 लाख 17 हजार रुपये आपल्या खात्यात जमा करुन घेतले. नंतर वराबरोबरचा संपर्कचा तोडला. त्यामुळे आपण फसलो गेलो हे लक्षात येताच संबंधित तरुणाने सायबर क्राईम विभागाकडे दाद मागितली.

चार महिन्यांपूर्वी फेब्रुवारीत हा सारा प्रकार घडला आहे. सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बँक खात्यात वधूने 1 लाख 17 हजार रुपये जमा करुन घेतले होते ते खाते पोलिसांनी वेळीच गोठविले आहे. त्यामुळे ही रक्कम तरुणाला परत मिळणार आहे. मात्र बेळगावच्या तरुणाला ठकविणारी वधू कोण-याचा उलगडा झाला नाही.

Related Stories

आतापर्यंत 20 कोटी घरपट्टी जमा

Patil_p

लोकसभा पोटनिवडणूकी दरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध

Rohan_P

शिवबसवनगर जोतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त पूजा

Patil_p

राखीव दलाचे कमांडंट हमाजा हुसेन यांचा सत्कार

Amit Kulkarni

अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन जागांसाठी निवडणूक

Patil_p

कर्नाटक: खासगी रुग्णालयांच्या वृत्तीबद्दल मुख्यमंत्र्यांचा संताप, कडक कारवाईचे दिले निर्देश

Shankar_P
error: Content is protected !!