तरुण भारत

टेस्टी समोसा सँडविच

मैत्रिणींनो, बटाटय़ाची भाजी घातलेलं किंवा व्हेज सँडविच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे समोसा सँडविच नक्की बनवून बघा. हे सँडविच घरातल्या लहानमोठय़ांना खूप आवडेल आणि संध्याकाळच्या वेळचं पोटभरीचं खाणंही होईल.

साहित्य :  ब्रेड स्लाईस, दोन ते तीन तयार समोसे, हिरवी चटणी, बटर, बारीक चिरलेली   शिमला मिरची, कांद्याच्या चकत्या, सॉस, चाट मसाला.

Advertisements

 कृती : ब्रेड स्लाईसच्या कडा कापून घ्या. ब्रेडच्या एका भागावर बटर आणि चटणी लावून घ्या. आवडत असल्यास टॉमेटो सॉसही लावता येईल. यानंतर समोस्याचे तुकडे करून घ्या. हे तुकडे ब्रेडवर नीट पसरवून घ्या. त्यावर कांद्याच्या चकत्यांचा थर लावा. मग सिमला मिरचीचे तुकडे पसरवा. वरून चाट मसाला भुरभुरा. वर दुसरा ब्रेड ठेवा. हे सँडविच टोस्ट करून घ्या. तुम्ही तव्यावरही सँडविच भाजू शकता. तुमचं समोसा टोस्ट सँडविच तयार आहे. सॉससोबत खायला द्या.

Related Stories

स्टफ्ड कटलेट

Omkar B

शेवया कटलेट

tarunbharat

चविस्ट कॉर्न चीज बॉल्स

Amit Kulkarni

काजू ग्रेव्ही

tarunbharat

बटाटा बिर्याणी

Omkar B

गोल्डन पॉकेट्स

Omkar B
error: Content is protected !!