तरुण भारत

रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झालीये

विविध विषाणू, जीवाणू, बुरशी तसंच अन्य रोगकारक घटकांच्या हल्ल्यापासून शरीराचं रक्षण करण्यात रोगप्रतिकाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. संरक्षण भिंत भेदून रोगकारक घटक शरीरात शिरलाच तर  रोगप्रतिकारक शक्ती आपली क्षमता अधिक वाढवते आणि संरक्षणाची व्याप्ती वाढवते. मात्र रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास शरीरात आजार घर करू लागतात. शरीर रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत झाल्याचे संकेत देत असतं. हे संकेत ओळखून वेळीच उपचार केल्यास तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता. शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याचं कसं ओळखायचं?  जाणून घेऊ.

  • शरीराची 70 टक्के रोगप्रतिकारकशक्ती पोटात सामावलेली असते. पोटातले बॅक्टेरिया रोगकारक घटकांशी लढा देऊन त्यांना रोखण्याचं काम करतात. या बॅक्टेरियांमुळे गुणकारी टी पेशींची निर्मिती होऊन रोगजंतूंना आळा बसतो. मात्र या बॅक्टेरियांच्या कमतरतेमुळे शरीर अनेक आजारांना बळी पडतं. सातत्याने होणारे जुलाब, उलटय़ा, अपचन, गॅस अशा समस्या या बॅक्टेरियांच्या कमतरतेकपडे अंगुलीनिर्देश करतात. आहार आणि जीवनशैलीत बदल करून या बॅक्टेरियांची संख्या वाढवता येईल.
  • सक्षम रोगप्रतिकारकशक्तीमुळे शरीरावरील जखमा लवकर बर्या होतात. मात्र जखम लवकर बरी होत नसेल तर तुम्ही सतर्क व्हायला हवं. कमकुवत रोगप्रतिकारशक्तीमुळे नव्या पेशी तयार होण्याच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्याने जखम लवकर बरी होत नाही.
  • पुरेशी झोप आणि आराम मिळाल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर हे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याचं लक्षण आहे. योगा आणि व्यायाम करून तुम्ही रोगप्रतिकारशक्तीला चालना देऊ शकता.
  • ताणतणाव तसंच चिंता, काळजीमुळेही रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते. 

Related Stories

तपासा तुमची ऑक्सिजन पातळी

Amit Kulkarni

डेंटल कॅपच्या अंतरगात….

Omkar B

आहार हवा हृदयस्नेही

Omkar B

लिंबाचा रस आणि कोमट पाणी घेताय ?

Omkar B

आरोग्यदायी शीतपेये

Omkar B

‘हेपेटाइटिस-ए’ पासून बचावासाठी…

Omkar B
error: Content is protected !!