तरुण भारत

कन्नड अभिनेता विजय संचारी यांचे निधन

विजय यांचा ब्रेनडेड झाल्याने कुटुंबियांना अवयवदानाचा घेतला निर्णय

विजय यांचा शनिवारी रात्री झाला होता अपघात

बेंगळूर/प्रतिनिधी

राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि कन्नड चित्रपट अभिनेता संचारी विजय यांचे सोमवारी निधन झाले. ते ३७ वर्षांचे होते. अपोलो हॉस्पिटल, बेंगळूर यांनी याविषयी निवेदन जारी केले आहे. संचारी यांचा शनिवारी रात्री बाइक चालवत असताना अपघात झाला होता. या अपघातात विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. संचारी यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी विजय संचारी यांचा ब्रेन डेड (मेंदूचे कार्य थांबलं) झाल्याचे सांगितले त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनीही दुःख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, विजय यांचा शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अपघात झाला. ते बाईकवर पाठीमागे बसले होते. पावसामुळे रस्ते ओले झाले होते त्यामुळे त्यांची बाईक घसरली आणि ते खाली पडले. यावेळी विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु डॉक्टरांनी विजय संचारी यांचा ब्रेन डेड (मेंदूचे कार्य थांबलं) झाल्याचे सांगितले

दरम्यान, २०१५ मध्ये ‘नानु अवानल्ला अवालु’ या सिनेमातून संचारी विजय यांनी आपली ओळख निर्माण केली. ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अॅक्ट १९७८ या सिनेमात त्यांना अखेरचे पाहण्यात आले होते. लॉकडाउनमध्ये विजय यांनी लोकांच्या मदतीसाठीही हात पुढे केला होता. यूसायर या टीमशी जोडून घेत ते करोना संक्रमित लोकांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत होते. ही माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांनाही दिली होती.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते संचारी विजय यांना बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात येईल. तसेच अवयवदान करण्यासाठी पुढे आलेल्या त्याच्या कुटुंबीयांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी प्रतिभावान कलाकार संचारी विजय यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब

Rohan_P

…म्हणून सचिन वाझेने अंबानींच्या घरासमोर ठेवली स्फोटकांची गाडी

Abhijeet Shinde

स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन

Rohan_P

देशात मागील चोवीस तासात 6 हजार 654 नवे कोरोना रुग्ण, 137 मृत्यू

tarunbharat

बेंगळूर: पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अटक

Abhijeet Shinde

#TokyoOlympics: पी.व्ही. सिंधूकडून हाँगकाँगच्या चेंग गँनचा पराभव करत नॉकआऊट’मध्ये प्रवेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!