तरुण भारत

ज्यांना लक्षणे आहेत अशांची टेस्ट, सरसकट टेस्टिंग नाही- आडिवरेकर

सावंतवाडी / प्रतिनिधी-

शहरात कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी प्रभागांमध्ये ‘रॅपिड टेस्ट’ करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेच विशेष पथक प्रभागवार काम करणार असून आज प्रभाग २ व ६ मधील नागरिकांसाठी काझी शहाबुद्दीन हॉल, गुरुवारी ७ व ८ प्रभागासाठी सालईवाडा वृद्धाश्रम, शुक्रवारी ५ व ४ प्रभागासाठी शाळा नं २, शनिवारी १ व ३ प्रभागासाठी वैश्यभवन याठिकाणी नागरीकांची क़ोरोना तपासणी होणार आहेत. ज्यांची तपासणी करण्याची इच्छा आहे, ज्यांना लक्षण आहे अशाच लोकांसाठी हि टेस्टींग सेवा दिली जाणार आहे. तर घरोघरी, सरसकट टेस्टींग होणार नसून इच्छा असलेल्यांचीच टेस्ट होणार आहे. यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी केले आहे. सदयस्थितीत शहरात १०७  सक्रीय रुग्ण आहेत. हे प्रमाण रोखण्यासाठी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

Related Stories

ओणी तिसेवाडीतील ग्रामस्थांना आजही पुनर्वसनाची प्रतीक्षा

Patil_p

लॉकडाऊन संपेपर्यंत मंगळवारची कणकवलीत सर्व दुकाने बंद!

NIKHIL_N

‘घुंगुरकाठी’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी

NIKHIL_N

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण

NIKHIL_N

उन्हाळे कुंभारवाडी येथे मालवाहू ट्रकला अपघात

Patil_p

रत्नागिरी : ४ दिवसांच्या तपासणीत बाजारपेठेत एकूण ३७ पॉझिटिव्ह

triratna
error: Content is protected !!