तरुण भारत

राज्यभरात आजपासून शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरु

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यभरात आजपासून २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रवेश सुरू होत असताना खासगी विनाअनुदानित शाळांकडून यावेळी कमी प्रवेशाची अपेक्षा आहे. मागील शैक्षणिक वर्षात निम्न ग्रेडसाठी शून्य भरतीचा विचार करून अनेक शाळांनी २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी बालवाडीसाठी प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान बेंगळूर येथील एका खासगी विनाअनुदानित शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, “लहान मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे सोपे नाही आणि बरेच पालक आपल्या मुलांना खालच्या वर्गात प्रवेश घेण्याचा विचार करीत नाहीत.” शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे, पालकांकडून खालच्या वर्गात प्रवेश घेण्याची मागणी करणारे फारच कमी पालक होते.

“सार्वजनिक शिक्षण विभागाने (डीपीआय) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आम्ही सर्व ग्रेडसाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारी सुरू करत असलो तरी आम्हाला बालवाडीत प्रवेशाची काहीच अपेक्षा नाही,” असे आणखी एक मुख्याध्यापक म्हणाले.

कर्नाटक प्रायव्हेट स्कूल मॅनेजमेन्ट्स, अध्यापन व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे संयोजक डी. शशी कुमार म्हणाले की २०२०-२१ शैक्षणिक वर्षात खालच्या वर्गातील प्रवेश जवळजवळ शून्य होते. “गेल्या वर्षी बालवाडीतील केवळ २ टक्क्यांपासून ३ टक्क्यांच्या जागांवर प्रवेश झाला. यावर्षी ते २ टक्क्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा नाही. ” “फक्त बालवाडीच नाही, तर गतवर्षी प्राथमिक स्तरावरही प्रवेश कमी होता,” असे शशी कुमार म्हणाले.

Advertisements

Related Stories

संपाच्या चौथ्या दिवशी सोळाशेहून अधिक बसेस धावल्या

triratna

कर्नाटकात शुक्रवारी १,२४७ बाधितांची नोंद

triratna

कोविड रुग्णांसाठी बेड आरक्षित न केल्यास कठोर कारवाई: आरोग्यमंत्री

Shankar_P

लॉकडाऊन-अनलॉक मार्गसूची जारी

Amit Kulkarni

ड्रोनद्वारे औषधे वाहतुकीचा प्रयोग 18 जूनपासून

Amit Kulkarni

डी. के. शिवकुमार यांच्या चौकशीला स्थगिती नाहीच

Rohan_P
error: Content is protected !!