तरुण भारत

…अन् विमानाचा फुटला टायर

नवी दिल्ली/प्रतिनिधी

कन्नूरहून कर्नाटककडे येत असलेल्या इंडिगो विमानातील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. सोमवारी संध्याकाळी कर्नाटकातील हुबळी विमानतळावर उतरताना इंडिगो विमानाचा टायर फुटला. तथापि, विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दल सदस्य सुरक्षित आहेत. मंगळवारी विमान कंपनीकडून ही माहिती देण्यात आली. एअरलाइन्सने सांगितले की सध्या विमान तपासणीसाठी घेण्यात आले आहे. इंडिगोचे विमान 6e -7979 कन्नूरहून हुबळीला जात होते. सोमवारी सायंकाळी लँडिंग दरम्यान ही घटना घडली. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मंगळवारी विमान कंपनीने एक प्रसिध्दीपत्रक जारी करत माहिती दिली.

एअरलाइन्स अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री 8:03 वाजता विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला परंतु उलट दिशेने जोरदार वारा असल्याने ते शक्य झाले नाही. साधारण अर्ध्या तासाने ते विमान उतरले. अधिकारी पुढे म्हणाले, “लँडिंगचा त्रास आणि विरुद्ध दिशेने जोरदार वारा यामुळे कदाचित टायर फुटला असवा. विमानात बसलेले सर्व प्रवासी स्वतःहून उतरले. दरम्यान सर्व प्रवासी आणि विमानातील कर्मचारी सुखरूप आहेत.

Advertisements

Related Stories

रत्नागिरी जिल्हय़ात आणखी आठ दिवस कडक लॉकडाऊन

Patil_p

राज्यात एकाचदिवशी 34 हजारांवर नवे रुग्ण

Amit Kulkarni

कर्नाटक: आ. एम. चंद्रप्पा यांनी केएसआरटीसी अध्यक्षपदाची स्वीकारली सूत्रे

triratna

कर्नाटक: तीन जागांवर विजय मिळवत विधानपरिषदेत भाजपा सर्वात मोठा पक्ष

Shankar_P

कर्नाटक विधानपरिषदेच्या उपाध्यक्षपदी एम. के. प्रणेश यांची वर्णी

Shankar_P

इंधन दरवाढीवर काँग्रेसचा निषेध मोर्चा

Shankar_P
error: Content is protected !!