तरुण भारत

सांगली : कसबे डिग्रजमध्ये १३ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

वार्ताहर / कसबे डिग्रज

कसबे डिग्रज येथील १३ वर्षीय समध मोहसीन शेख या मुलाचा अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे कसबे डिग्रजमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाणाक्ष बुद्धी चातुर्याच्या जोरावर या मुलाने दोन अनोळखी इसमापासून स्वतःची सुटका करून घेतली.

Advertisements

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, समध शेख हा त्याची आई व लहान बहीण हे गेल्या अनेक काही दिवसांपासून कसबे डिग्रजमध्ये उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत. त्यांचे मूळ गाव घेरडी (ता.जत) आहे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान समध हा मुलगा तुकाराम महाराज मंदिर परिसरात खेळत होता. दरम्यान मोठा पावसाला सुरुवात झाली होती याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी या मुलाच्या तोंडाला रुमाल लावून गाडीवरून घेऊन गेले.

संबंधित अनोळखी दोन्ही इसम यांनी काळ्या रंगाचे कपडे घातलेले असून तोंड झाकलेला आहे होते. दुचाकीस्वारांनी मारुती मंदिरापासून स्मशानभूमीकडे गेलेल्या रस्त्याकडे त्यांनी गाडी वळवल्याने रस्ता चुकल्याचे समजताच नदीकाठावर गाडी लावून दोन्ही इसम रस्ता शोधत असल्याचे लक्षात येताच या मुलाने योग्य संधी आणि वेळ साधून हाताला धरून उभारलेल्या इसमाच्या हाताला जोरात चावा घेतला आणि तिथून पळ काढला. ते दोघेही या मुलाच्या पाठीमागे पळत असताना घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मुलाने रस्त्यावरून जाताना आरडाओरड सुरू केली होती. त्यामुळे ग्रामस्थ जमा होतील या भीतीपोटी ते दोन्ही इसमांनी तिथून पळ काढला. झटापटीमध्ये मुलाचे कपडे घाण झाले तसेच मारहाण केल्याने त्याच्या अंगावर नखाचे ओरखडे दिसून आले आहेत. ते दोन्ही इसम एकमेकाशी कन्नड भाषेमध्ये बोलत असल्याचे या तेरा वर्षीय मुलाने सांगितले आहे. सदरच्या घटनेची माहिती मिळताच उपसरपंच सागर चव्हाण, प्रमोद चव्हाण, संजय शिंदे, अजित काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत उपसरपंच सागर चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिलेली आहे.

Related Stories

सांगली : वसगडे बंधारा ‘ओव्हर फ्लो’

triratna

सांगली : उपभोक्ता कर रद्द न झाल्यास मनपावर हल्लाबोल

triratna

सांगलीत उद्या जिजाऊ आदर्श आई पुरस्काराचे वितरण

triratna

सांगली : नेर्ले जवळ अपघातात ऊसतोड मजूर गंभीर जखमी

triratna

सांगली : डॉ. जाधवची मालमत्ता विकून मयत रुग्णांच्या नातेवाईकांना द्या

triratna

सांगली : मिरज शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके

triratna
error: Content is protected !!