तरुण भारत

आगामी विधानसभा समविचारी पक्षांसोबत लढणार

ऑनलाईन टीम / लखनऊ : 

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुक समाजवादी विचारसरणीच्या लोकांसह लढणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Advertisements

अखिलेश यादव म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत प्रगतिशील समाजवादी पक्षाचे प्रमुख शिवपालसिंग यादव यांच्यासह इतर सर्व समविचारी पक्षांना सोबत घेण्यास समाजवादी पक्ष मागेपुढे पाहणार नाही. सपा जसवंतनगर विधानसभेच्या जागेवर कोणताही उमेदवार देणार नाही. आवश्यकतेनुसार इतर जागादेखील विचारात घेतली जातील. 

राष्ट्रीय लोकदलाव्यतिरिक्त संजय चौहान यांचा जनवादी पक्ष आणि केशव मौर्य यांची महान दल पक्षाशी युती झाली आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाची कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती होणार नाही, असेही अखिलेश यांनी सांगितले. 

Related Stories

लॉकडाऊन-5 ची नवी मार्गसूची सरकारकडून जारी

Patil_p

कोरोना : दिल्लीत दिवसभरात 8,798 नवे बाधित; 39 मृत्यू

Rohan_P

UGC चे निर्देश : 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार नियमित सत्र

Rohan_P

दिलासादायक : दिल्लीत दिवसभरात 1200 रुग्णांना डिस्चार्ज

Rohan_P

आता आधारप्रमाणेच मिळणार युनिक हेल्थ कार्ड

datta jadhav

शिरोमणी अकाली दल अन् बसप एकत्र

Patil_p
error: Content is protected !!