तरुण भारत

वंदूर येथील पूरग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

वार्ताहर / वंदूर

वंदूर ता. कागल येथील पूरग्रस्तांनी जागेसाठी ग्रामपंचायतीला वेठीस धरून आम्हाला राहण्यासाठी व जनावरांचासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अशा आशयाचे निवेदन सरपंच सविता हिरेमठ यांना देण्यात आले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पुन्हा पूरस्थिती उद्भवली तर आम्हा पूरग्रस्तांची राहण्याची सोय ग्रामपंचायतीने करावी व आमच्या निवेदनाचा विचार करावा असे न झाल्यास पूरग्रस्तांच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पूरग्रस्तांची जागेअभावी कुचंबना होत आहे. दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या लोकांना पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला होता. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर राहण्यासाठी जागा व जनावरांसाठी जागा नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने राहण्यासाठी व जनावरांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.

सदर निवेदनामध्ये, अनेक वेळा जागेची मागणी करूनही जागा मिळत नसल्याने त्याकडे प्रशासन साफ दुर्लक्ष करत आहे. वंदूर ता. कागल हे दुधगंगा नदीच्या काठावरील गाव आहे .दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुरामुळे पाणी नदीकाठी असलेल्या घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे त्यांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागत असे. असा प्रसंग पुन्हा होऊ नये म्हणून अर्ज व विनंत्या करून सुद्धा सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करत आहेत व फक्त आश्वासने देण्याचे काम करत आहेत. त्याची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापुरावेळी नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरते त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून तेथील लोक राहतात. त्यामुळे प्रशासनाने पूरग्रस्तांचा विचार त्वरित करून जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

असे नझाल्यास पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी व जनावरांसाठी ग्रामपंचायतीने सोय करून द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. याचा विचार लवकरात लवकर न झाल्यास जागेसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .
निवेदनावरती कोंडीबा लोकरे, संदीप लोकरे, बळीराम इंगळे, सुकुमार जंगटे, शिवाजी पाटील, राजाराम सदलगे, राजाराम चौगुले, तानाजी बागणे, राणी रणदिवे आधी पूरग्रस्तांच्या सह्या आहेत.

Advertisements

Related Stories

सांगली : मुख्याधिकारी अरविंद माळी यांची पंढरपुरला पदोन्नतीवर बदली

Abhijeet Shinde

‘हरिपूर’ आणि ‘माधवनगर’ जिल्हा परिषदेच्या नव्या मतदारसंघाच्या मागणीला जोर

Abhijeet Shinde

तुंबलेली गटर्स, कचऱ्याचे ढीग यावर किती दिवस चर्चा करायची ?

Abhijeet Shinde

आंतरराष्ट्रीय मास्टर देनीस मखनेव ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

Abhijeet Shinde

कोल्हापूर : विश्वविक्रमवीर डाॅ. केदार साळूंखे ग्लोबल किड्स ॲचिव्हर्स अवॉर्ड 2020 या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Abhijeet Shinde

रविकांत अडसूळ यांनी कोल्हापूर मनपा उपायुक्त पदाची सूत्रे स्वीकारली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!