तरुण भारत

भारतीय मुलीला ब्रिटनचा तिसऱया क्रमांकाचा पुरस्कार

अमिका जॉर्जचा एमबीई पुरस्काराने गौरव

भारतीय वंशाची अमिका जॉर्ज (21 वर्षे) हिला बिटिश सरकारने शाळांमध्ये फ्री-पीरियड उत्पादनांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठित ‘मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (एमबीई) पुरस्कार प्रदान केला आहे. स्वतःच्या कामाद्वारे लोकांसाठी प्रेरणा ठरणाऱया व्यक्तीला ब्रिटनमधील हा तिसऱया क्रमांकाचा पुरस्कार देण्यात येतो.

Advertisements

कॅम्ब्रिज विद्यापीठात इतिहासाची विद्यार्थिनी असलेल्या अमिकाचे आईवडिल मूळचे केरळमधील आहेत. अमिका मागील अनेक वर्षांपासून ब्रिटनच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘फ्री पीरियड’ उत्पादने उपलब्ध करवित आहे. अमिकाने वयाच्या 17 व्या वर्षापासून ही मोहीम सुरू केली होती.

ऑनर्स सिस्टीमचे साम्राज्य आणि आमच्या वसाहतवादी भूतकाळासह हे काम करणे सोपे नव्हते. साम्राज्य आणि ब्रिटनच्या इतिहासावरून शिक्षणातील कमतरतेकडे लक्ष वेधण्यासाठी हा पुस्कार स्वीकारणे माझ्यासाठी एक मोठी संधी आहे. युवांच्या आवाजात किती बळ आहे हे दाखविणे माझ्यासाठी आवश्यक असल्याचे अमिका म्हणाली.

ब्रिटनमध्ये अनेक मुली पीरियड्सवेळी सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने शाळेत जाऊ शकत नसल्याची माहिती अमिकाला काही वर्षांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पीरियड उत्पादनांवरून तिचे प्रयत्न सुरू आहेत. यात एक याचिका दाखल करणे आणि अनेक मंत्र्यांच्या भेटी घेणेही सामील आहे.

Related Stories

फ्ल्यू अन् कोरोना एकत्र झाल्यास मृत्यूचा धोका दुप्पट

Omkar B

अमेरिकेने पॅसिफिक महासागरात तैनात केल्या तीन विमानवाहू नौका

datta jadhav

पाकिस्तानच्या संसदेत दहशतवादाविरुद्धचे विधेयक मंजूर

datta jadhav

जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी झाला खुला

Patil_p

भेटीच्या माध्यमातून भारत-नेपाळ संबंध सुधारतील!

Omkar B

UAE मध्ये कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

datta jadhav
error: Content is protected !!