तरुण भारत

रोनाल्डोचा ‘डॅझलिंग माईलस्टोन’!

युरो चषक स्पर्धेत 11 गोल करणारा पहिलाच खेळाडू, प्लॅटिनीचा 9 गोलांचा विक्रम मोडला

@ बुडापेस्ट / वृत्तसंस्था

Advertisements

फुटबॉल वर्तुळातील सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने अवघ्या 5 मिनिटात दोनवेळा गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतल्यानंतर पोर्तुगालने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत प्रतिस्पर्धी हंगेरीचा 3-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. रोनाल्डोने 87 व्या मिनिटाला पहिला गोल केला तर जादा वेळेत दुसऱया मिनिटाला आणखी एक गोल नोंदवत आपले स्टारडम नव्याने अधोरेखित केले. या दोन गोलांसह तो युरो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल नोंदवणाऱया खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी देखील थाटात विराजमान झाला आहे.

युरो स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम यापूर्वी फ्रान्सच्या मायकल प्लॅटिनीच्या खात्यावर होता. प्लॅटिनी यांच्या खात्यावर 9 गोल आहेत. तो विक्रम येथे रोनाल्डोने आपल्या खात्यावर केला. रोनाल्डोच्या खात्यावर आता युरो स्पर्धेत 11 गोल नोंद आहेत.

हंगेरीचा संघ येथे मायभूमीत खेळत होता. पण, रोनाल्डोसारख्या अव्वल प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना हंगेरियन संघाला बऱयाच मर्यादा होत्या. त्या या सामन्यात दिसून आल्या. तसे पाहता, रोनाल्डोला दुसऱया सत्रातील खेळापर्यंतही सूर सापडत नव्हता. पण, सामन्यातील शेवटची काही मिनिटे बाकी असताना अचानक त्याने फिनिक्स झेप घेतली आणि आपल्या खेळातील नजाकत, अभिजात गुणवत्ता दाखवून दिली.

वास्तविक, हंगेरीच्या स्कॉनने 80 व्या मिनिटाला गोल नोंदवत खळबळ उडवून दिली होती. पण, ऑफसाईडमुळे रेफ्रीनी तो अवैध ठरवला आणि हंगेरीची नामी संधी दवडली गेली. त्यानंतर चारच मिनिटांच्या अंतराने पोर्तुगालतर्फे ग्युएरोने पहिला गोल नोंदवला. 86 व्या मिनिटाला हंगेरीच्या ऑर्बनला राफा सिल्वाला इनसाईड बॉक्समध्ये पाडवल्याबद्दल यलो कार्ड देण्यात आले आणि पोर्तुगालला पेनल्टी बहाल केली गेली. या सुवर्णसंधीचा पुरेपूर लाभ घेत रोनाल्डोने गोलजाळय़ाच्या उजव्या बाजूला चेंडू लाथाडत संघाचा दुसरा गोल नोंदवला आणि आघाडी 2-0 अशी भक्कम केली. याच गोलासह रोनाल्डोच्या खात्यावर युरो स्पर्धेत सर्वाधिक गोलच्या विक्रमाची नोंद झाली.

जादा वेळेत दुसऱया मिनिटाला देखील बॉक्समध्येच रोनाल्डोने डॅझलिंग फुटवर्कच्या बळावर आणखी एक सहजसुंदर गोल केला आणि यासह पोर्तुगालने 3-0 अशा धडाकेबाज विजयाची नोंद करत युरो स्पर्धेत आपल्या आगमनाची जोरदार वर्दी दिली.

Related Stories

दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजू वरचढ : स्मिथ

Patil_p

एबी डिव्हिलियर्सची IPL मधून निवृत्ती

datta jadhav

विल्यम्सनला काही सामने हुकण्याची शक्यता

Amit Kulkarni

सुपर थ्रोसह नीरज चोप्रा अंतिम फेरीत!

Patil_p

राष्ट्रकुल टी-20 स्पर्धेसाठी भारतासह सहा महिला संघ पात्र

Patil_p

नवल टाटा हॉकी अकादमीला माजी हॉकीपटूंची भेट

Patil_p
error: Content is protected !!