तरुण भारत

बाधितांच्या संख्येत किंचित वाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी बाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली. मागील 24 तासात 62 हजार 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 2542 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 कोटी 96 लाख 33 हजार 105 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 79 हजार 573 एवढी आहे. 

Advertisements

मंगळवारी 1 लाख 07 हजार 628 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 2 कोटी 83 लाख 88 हजार 100 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 8 लाख 65 हजार 432 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

मागील 24 तासात 28 लाख 458 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 26 कोटी 19 लाख 72 हजार 014 नागरिकांना लस देण्यात आली आहे.

Related Stories

एकात्मभक्ती

Patil_p

तिरुपती बालाजीला सोन्याची तलवार अर्पण

Patil_p

युक्रेनचे विमान चुकून पाडले; इराण लष्कराने दिली कबुली

prashant_c

यूपीएससी परीक्षेची तारीख जाहीर

datta jadhav

घरगुती सिलिंडर 15 रुपयांनी महाग

Patil_p

गणतंत्र दिन संचलन रद्द करण्याची सूचना

Omkar B
error: Content is protected !!