तरुण भारत

सोलापूर : पायी आषाढीवारी परवानगीसाठी वारकरी मंडळाकडून भजन आंदोलन

प्रतिनिधी / सोलापूर

आषाढी वारी ही सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासनारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येणेसाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी या मागणीसाठी बुधवारी अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे वतीने सोलापूर येथील जी. प. गेट समोर भजन आंदोलन करण्यात आले.

वारकरी परंपरेमध्ये ” पंढरीची वारी जयाची ये कुळी | त्याची पाय धुळी लागो मज || ” या उक्ती प्रमाणे वारी विषयी धारणा खूपच मोठी असून नित्य नेमाला खूप मोठे महत्व आहे. तो नेम निष्ठेने सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, हनुमान जयंती,गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका  घेतली नाही.

शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती.केंद्र व राज्य दोन्ही सरकारचे निर्बंध होते.आत्ता फक्त राज्य शासन निर्बंध आहेत. शिवाय सध्या रुग्ण संख्या ही खूप कमी होत आहे.बाजार पेठा गजबजू लागल्या आहेत. आषाढी वारीस अटी, नियम लावून परवानगी द्यावी.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, बळीराम जांभळे, ज्योतीराम चांगभले, संजय पवार, अविनाश पवार, कुमार गायकवाड, किशोर धायगुडे आदी पदाधिकारी उपस्थित  होते.

Advertisements

Related Stories

ऑईल मिल मालकास वीज चोरी पडली भारी

Abhijeet Shinde

मठाधिपती पिसाळांवर लवंडमाचीत अंत्यसंस्कार

Abhijeet Shinde

सोलापूर : नेत्यांची मुले सुरक्षित तर जनता असुरक्षित

Abhijeet Shinde

पंढरपुरातील लॉकडाऊन एक दिवसाने वाढवला

Abhijeet Shinde

बिलोलीच्या घटनेतील आरोपींना शक्ती कायद्या अंतर्गत फाशीची शिक्षा द्या

Abhijeet Shinde

विजेचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!