तरुण भारत

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ राज्य सरकारच्या नजरकैदेत

धक्कादायक : `सारथी’ने बालभारतीला दिलेली 50 हजार पुस्तकांच्या छपाईची ऑर्डर थांबविलीः शिवरायांचे मौलिक विचार तळागाळापर्यंत पोहचण्यात सरकारी अडथळा

कोल्हापूर / संजीव खाडे

Advertisements

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर सारथी'चे कामकाज ठप्प झाल्याचे अनेक गंभीर आरोप झाले. त्यानंतर आता एक अत्यंत धक्कादायक अशी माहिती पुढे आली आहे.सारथी’ने छत्रपती शिवाजी महाराजांचे मौलिक विचार राज्यभर पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीगंथ शाळा, कॉलेजमध्ये देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यासाठी बालभारतीकडे 50 हजार प्रतींची ऑर्डर देवून 63 लाख रूपये भरले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या उपक्रमाला बेक लागला असून `सारथी’शी संबंधित असलेल्या एका बडÎा अधिकाऱयाच्या समितीने निधीचा अपव्यय असे सांगत या उपक्रमाला बेक लावला आहे.

`सारथी’ आणि बालभारती या दोन्ही संस्था राज्य सरकारच्या मालकीच्या आहेत. बालभारतीने सत्तरच्या दशकात छत्रपती शिवाजी महाराज स्मृती गंथाची निर्मिती केली. या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सखाराम सरदेसाई, कृष्णराव अर्जुन केळुस्कर, सर जदूनाथ सरकार, डॉ. बाळकृष्ण, त्र्यंबक शंकर शेजवलकर, वा. सी. बेंद्रे, सेतु माधवराव पगडी, नरहर कुरूंदकर, लेफ्टनंट कर्नर म. ग. अभ्यंकर, डॉ. भा. कृ. आपटे, गो. नि. दांडेकर, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, प्रा. ग. ह. आपटे, प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आदींचे लेख आहेत. विशेष म्हणजे पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशानंतर पुन्हा या गंथाचे प्रकाशन झाले नाही.

`सारथी’ने घेतला पुढाकार

विविध समाजपुरूषांचे विचार त्यांच्यावरील गंथ, पुस्तकांच्या माध्यमातून समाजपर्यत पोहचविण्याचा उपक्रम बार्टी'तर्फे राबविला जातो. त्याच धर्तीवरसारथी’ने बालभारतीने पूर्वी प्रकाशित छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्मृतीगंथ राज्यातील गावागावात पोहचविण्याचे ठरविले. तारादूतांमार्फत राज्यभरातील 35 हजार शाळा, कॉलेज आणि ग्रंथालयात स्मृतीग्रंथ पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सारथी'चे संचालक परिहार होते. त्यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार बालभारतीशी चर्चा झाली. छपाईच्या किंमतीत ग्रंथ देण्याचे बालभारतीने मान्य केले. ग्रंथाच्या पन्नासहजार प्रतींची छपाई करण्यासाठीसारथी’ने बालभारतीला 63 लाख रूपयांची रक्कमही दिली. त्यानंतर छपाईचे काम सुरू होणार होते. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे `सारथी’ची सूत्रे गेली.

त्यांनी अनेक बदल केले. अधिकाऱ्यांच्या कामावर आक्षेप घेत त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. काहींना बदलण्यात आले. स्टाफ कमी करण्यात आला. या सर्व गदारोळात `सारथी’कडून मराठा विद्यार्थ्यांना मिळणाऱया शैक्षणिक विकासाच्या सवलती, शिष्यवृत्ती मिळणे बंद झाले. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांची आंदोलनेही झाली. या सगळÎात गंभीर बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्मृती गंथासाठी दिलेले पैसे निधीचा अपव्यव आहे, असा आक्षेप घेत एका सचिव दर्जाच्या अधिकाऱयाच्या समितीने छपाईच्या कामाला बेक लावला. परिहारांना टार्गेट करण्यात आले. त्याचवेळी स्मृतीग्रंथही लालफितीत अडकविण्यात आला. मंत्री वड्डेटीवार यांच्याकडून सारथीची सूत्रे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेली असली तरी शिवाजी महाराजांवरील स्मृतीग्रंथ मात्र अजूनही लालफितीत आहे.

महाविकास आघाडी सरकारचे बेगडी प्रेम

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे नाव घेऊन राज्य चालविणाऱया महाविकास आघाडी सरकारला युगपुरूष शिवरायांबद्दल किती प्रेम आहे, हे स्मृतीग्रंथावरील लालफितीने स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या गंभीर घटनेबद्दल `सारथी’ स्ट्राँग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील देखील अनभिज्ञ आहेत.

Related Stories

निधीअभावी शहरातील प्रकल्प रखडणार नाहीत

Abhijeet Shinde

प्रियांका गांधींनी म्युकरमायकोसिस इजेक्शन कमतरेतवरून साधला मोदी सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

Abhijeet Shinde

एसटी कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत जमा होईल

Rohan_P

ऍट्रासिटीची भीती दाखवून उकळली आठ लाखांची खंडणी

Patil_p

मुख्यमंत्र्यांनी मृत्यूनंतर अवयव दान करण्याचे दिले वचन

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून सुरु

Rohan_P
error: Content is protected !!