तरुण भारत

”छगन भुजबळांचे आंदोलन म्हणजे ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न”


मुंबई \ ऑनलाईन टीम

आरक्षणासाठी मराठा समाजाने मूक मोर्चा काढल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. उद्या गुरुवारी समता परिषदेने ‘ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’चं आयोजन केलं आहे. समता परिषदेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या आंदोलनावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सडकून टीका केली आहे. राज्य सरकारमध्ये मंत्री असताना छगन भुजबळ यांचे ओबीसी आरक्षणासाठी आंदोनल काढणं म्हणजे ओबीसींच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रविण दरेकर यांनी ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, मंत्री छगन भुजबळ यांच्या संघटनेने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला,याचा अर्थ त्यांचा सरकारवर विश्वास नाही! ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण साधण्याचा हा प्रयत्न असून राज्य सरकार ने राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही,तर पदाचा राजीनामा देण्याचं धाडस दाखवणार का?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधल्याच मंत्र्याची संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात उतरते. याचा अर्थ राज्य सरकारवर विश्वास नाही. किंवा सरकारकडून काम करुन घ्यायचे नाही. आपला तो मुद्दा आहे म्हणून राजकारण करायचं असा स्पष्ट याचा अर्थ होतो. छगन भुजबळ या राज्याचे महत्त्वाचे नेते असून सरकारमधले महत्त्वाचे नेते आहेत. ओबीसीच्या संदर्भात राज्य सरकारने जे करायला पाहिजे ते कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन समाजाला ते देऊ शकतात परंतु दुर्दैवाने तसे काही होताना दिसत नाहीत. ओबीसीच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं राजकारण साधता येतंय का?, अशा प्रकारचा प्रयत्न यामागे दिसत आहे. भुजबळ यांना समाजाविषयी कदर असेल तर त्यांनी सरकारला आव्हान द्यावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीरी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला वेळ द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडावला नाही तर माझ्या पदाचा राजीनामा देतो असं धाडस भुजबळ दाखवणार का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. हे सगळे प्रश्न निरर्थक आहेत जो प्रश्न सरकारशी संबंधित आहे. ज्या सरकारचा भुजबळ एक भाग आहेत. भुजबळ यांनी मंत्रिमंडळात बसून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे, असे प्रविण दरेकर या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.

Advertisements

Related Stories

पुण्यात पुढील 7 दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन! दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी

Rohan_P

कोल्हापूर : बीएसएनएल’ची ढिसाळ यंत्रणा, गेली महिनाभर ना नेटवर्क.. ना इंटरनेट

Abhijeet Shinde

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा हल्ला; 2 जवान शहीद

Rohan_P

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी बांधवाचा मोर्चा

Rohan_P

शिवाजी महाराजांच्या चेहऱयावर मोदी, तानाजींच्या शाह; व्हिडिओ व्हायरल

prashant_c

मंत्र्याचे बेताल वक्तव्य : वृध्द दगावले तरी चालेल; मुलांना मिळाली पाहिजे होती लस

Rohan_P
error: Content is protected !!