तरुण भारत

टोकियोतील जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रवीण जाधवची निवड

फलटण / प्रतिनिधी : 

जपानमधील टोकियो येथे 23 जुलैपासून सुरु होणाऱ्या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेमधील ‘आर्चरी’  या क्रीडा प्रकारासाठी भारतीय संघात सरडे (ता.फलटण) गावचा सुपुत्र प्रवीण रमेश जाधव याची निवड झाली आहे.

Advertisements

प्रविण जाधव हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे या गावचा रहिवासी असून, त्याचे प्राथमिक शिक्षण याच गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले आहे. या शाळेतील त्याचे शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याच्याकडील आर्चरीमधील कौशल्य ओळखून त्याला खेळासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर प्रविण अमरावती येथे ‘आर्चरी’ चे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. नेमबाजीतील कौशल्यावर त्याची 2015 साली आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कॅम्पसाठी निवड झाली. यातूनच पुढे सन 2016 च्या आर्चरीच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात प्रविणला संधी मिळाली आणि आता टोकियो येथे होत असलेल्या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पदकाचा अचूक वेध घेण्यासाठी प्रविण सज्ज झाला आहे.

या यशाबद्दल प्रविण जाधव सांगतो की, मी आज जे काही आहे ते तिरंदाजीमुळे आहे. मी जर खेळाकडे वळालो नसतो तर कदाचित आज मी कुठेतरी शेतमजूर, कामगार म्हणून काम करत असतो. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशासाठी पदक जिंकणे हेच माझे ध्येय आहे. 

Related Stories

ख्रिस्टियानो रोनाल्डोचा 800 वा गोल

Patil_p

दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कप संघात तीन स्पिनर्स

Amit Kulkarni

पहिल्या कसोटीत इंग्लंडची घसरगुंडी

Patil_p

पाटणा पायरेट्सची तेलुगू टायटन्सवर निसटती मात

Patil_p

आय लीग स्पर्धेतील उर्वरित सामने रद्द?

Patil_p

‘सूर्य’ तळपला! ‘टॉस’ नव्हे, भारतच ‘बॉस’!

Amit Kulkarni
error: Content is protected !!