तरुण भारत

रोनाल्डोच्या निर्णयाचा कोकाकोला’ला फटका

दोन बाटल्या बाजूला ठेवणे पडले महाग – 29.34 हजार कोटीचे नुकसान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

जगात पोर्तुगालचा फुटबॉलमधील स्टार स्ट्राइकर क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या एका निर्णयाने प्रसिद्ध शितपेय विक्री करणाऱया कोकाकोला कंपनीला महाग पडले आहे. यामध्ये पत्रकार परिषद सुरु असताना त्यांनी टेबलावरील दोन कोकाकोलाच्या बाटल्या बाजूला ठेवल्यामुळे कंपनीला 29.34 हजार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. सदरची घटना घडल्याच्या काही वेळातच कंपनीचे समभाग हे जवळपास 1.6 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले.

ऑस्ट्रेलियन असोसिएशन प्रेस याच्या माहितीनुसार समभागातील घसरणीमुळे कोकाकोलाचे बाजारमूल्य 242 अब्ज डॉलर्सवरुन 238 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे. कोकाकोला 11 देशांमध्ये खेळल्या जाणाऱया युइएफए युरो कपचा ऑफिशिअल स्पॉन्सरही राहिला आहे.

फिटनेसवर भर

वय वर्ष 36 असणारा रोनाल्डो आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करत असतो. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकरीता कोल्डड्रिंक, एअरेटेड ड्रिंकपासून लांब राहणेच खेळाडू पसंत करतात. रोनाल्डोचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अन्य जगभरातील खेळाडू चाहते आहेत.

Related Stories

बीएमडब्ल्यू 2009 नंतर पहिल्यांदा नुकसानीत

Patil_p

राधे डेव्हलपर्सच्या समभागाने दिला उत्तम परतावा

Patil_p

देशी ट्विटर म्हणून ओळख असणारे ‘कू’ ऍप आता स्थानिक भाषांमध्ये

Patil_p

ल्यूपिनचा दुसऱया तिमाहीत नफा घटला

Amit Kulkarni

एलईडी दिवे महागणार

Amit Kulkarni

जन औषध केंद्रांवर व्हॉट्अप-ईमेलच्या मदतीने मिळणार औषधे

Patil_p
error: Content is protected !!