तरुण भारत

मे महिन्यात निर्यातीत लक्षणीय वाढ

आयातीत 74 टक्क्यांची भर- व्यापारी तूट आठ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोना संकटादरम्यान निर्यातीच्या उत्तम आकडेवारीमुळे देशाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यातील निर्यात वार्षिक आधारावर 69 टक्क्यांनी वधारली आहे. मागील महिन्यात 32.3 अब्ज डॉलर्सच्या सामग्रीची निर्यात झाली. महत्त्वाच्या विदेशी बाजारपेठांमध्ये भारतीय सामग्रीची मागणी वाढली आहे. मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतरही मे 2019 च्या तुलनेत 8 टक्के अधिक निर्यात झाली आहे.

पण मागील महिन्यात फार्मा कंपन्यांकडून होणारी निर्यात वार्षिक आधारावर 5.4 टक्क्यांच्या घसरणीसह 1.9 अब्ज डॉलर्सवर आली आहे. याचे कारण अमेरिका आणि युरोपीय महासंघात कोरोनाचा कमी होत चाललेला संसर्ग आहे. कोरोनामुळे मागील आर्थिक वर्षात औषध कंपन्यांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली होती.

सलग तिसऱया महिन्यात वृद्धी

देशाची निर्यात सलग तिसऱया महिन्यात वाढली असल्याने व्यापार मजबुतीत येत असल्याचा संकेत मिळत आहे. 2018-19 मध्ये निर्यात जवळपास 9 टक्क्यांनी वाढली होती. तर 2019-20 मध्ये 5 टक्क्यांनी निर्यात घटली होती.

आयातीतही वाढ

अभूतपूर्व संकट आणि लॉकडाउनदरम्यान मे महिन्यात वाढलेले निर्यातीचे आकडे उत्साह वाढविणारे आहेत. पण मे महिन्यात आयातीत 74 टक्क्यांची वाढ होत हा आकडा 38.6 अब्ज डॉलर्सच्या पातळीवर पोहोचली आहे. पण आयात मे 2019 च्या पातळीपेक्षा 17 टक्क्यांनी कमी आहे. चालू वर्षाती मे महिन्यात पेट्रोलियम आयात 179 टक्क्यांनी वाढून 9.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. कच्च्या तेलातील दरवाढ याकरता कारणीभूत आहे. सोन्याची आयातही 790 टक्क्यांनी वाढून 67.9 कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे. खाद्यतेलांची आयात 149 टक्क्यांनी वाढून 1.4 डॉलर्सवर गेली आहे.

6.3 अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट

अलिकडच्या महिन्यांमध्ये विदेशी व्यापारात आलेली तेजी देश महत्त्वाच्या विदेशी बाजारपेठांची मागणी वाढल्यावर त्याची पूर्तता करण्याच्या स्थितीत असल्याचे दर्शविते. याचदरम्यान व्यापारी तूट मोठय़ा घसरणीसह 8 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजा 6.3 अब्ज डॉलर्सवर आली आहे. एप्रिल महिन्यात व्यापारी तूट 15.1 अब्ज डॉलर्सची होती.

मुख्य उद्योगक्षेत्रांची निर्यात वाढली

मे महिन्यात मुख्य उद्योगक्षेत्रांच्या (पेट्रोलियम आणि जेम अँड ज्वेलरी वगळता) निर्यातीत 47 टक्क्यांनी वाढली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यात सुमारे 12 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. मागील महिन्यात मुख्य उद्योगक्षेत्रांकडून होणाऱया आयातीत 52 टक्क्यांची भर पडली आहे. परंतु 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 3 टक्क्यांनी कमी राहिले आहे.

Related Stories

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 543 रुग्णांची भर

Rohan_P

मल्ल्याची कोटय़वधीची मालमत्ता फ्रान्समध्ये जप्त

Patil_p

इंग्लंडमध्ये 85 जणांमागे एक व्यक्ती बाधित

Patil_p

युनिकॉर्नच्या शर्यतीत भारत चीनपेक्षा आघाडीवर

Patil_p

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 63 लाखांच्या पार

Rohan_P

400 कोटींचे हेरॉईन गुजरातमध्ये जप्त

Patil_p
error: Content is protected !!