तरुण भारत

टेम्पो-दुचाकी अपघातात तरुण ठार

देवरूख पूर फाटा येथील घटनेत तिघे जखमी

वार्ताहर/ ताम्हाने

Advertisements

देवरुख-रत्नागिरी मार्गावर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात रोहित प्रकाश कांबळे (रा. णाळवाशी) हा तरुण ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. हा अपघात पूर फाटय़ाजवळ दुपारी दीडच्या सुमारास घडला.

देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, याची खबर टेम्पो चालक बंदेश कृष्णा कदम (किरदाडी कदमवाडी) यांनी दिली. ते आपल्या ताब्यातील टेम्पो घेऊन किरदाडीहून देवरुखला येत होते. यावेळी समोरून येणाऱया पल्सर दुचाकाशी समोरासमोर धडक झाली. खड्डे चुकवताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. यात दुचाकीस्वार रोहित कांबळे गंभीर जखमी झाला. रोहित सोबतचे दत्ताराम शिवा करंडे, टेम्पोचालक बंदेश कदम व त्यांच्यासोबतचे सुभाष सुर्वे असे तिघेही या अपघातात जखमी झाले आहेत.

देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, संतोष सडकर, किशोर जोयशी, जे. एस. तडवी, विश्वास बरगाळे, संदीप जाधव, सचिन पवार आणि प्रथमेश उकार्डे आदींनी घटनास्थळी जात जखमींना देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रोहित गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक जे. एस. तडवी करीत आहेत.

Related Stories

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पोलिओचा शुभारंभ

Patil_p

सातारा : श्रमिक मुक्ती दलाचे कटगुणला आंदोलन

datta jadhav

सातारा : शाहूपुरी ग्रामपंचायतीसह इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार : उपनगराध्यक्ष मनोज शेंडे

triratna

मानवी रक्षा व भाजीपाल्याच्या कचऱयापासून खत निर्मिती..!

Patil_p

वाई येथे अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध

triratna

साताऱ्यातील फेरीवाल्यांना पालिका देणार 1000 रुपये : खा. उदयनराजे

datta jadhav
error: Content is protected !!