तरुण भारत

कोयना धरणाचा पाणीसाठा 8 फुटांनी वाढला

पाणलोट क्षेत्रात मुसळधार; 33.31 टीएमसी पाणीसाठा

प्रतिनिधी / नवारस्ता

Advertisements

गेल्या चोवीस तासांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी रात्रभर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. संततधार पावसामुळे गेल्या चोवीस तासांत म्हणजे गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत धरणाच्या पाणीसाठय़ात प्रतिसेकंद 41  हजार 929 क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणाची पाणी पातळी 8 फुटांनी वाढली आहे.

    कोकणचे प्रवेशद्वार समजले जाणाऱया पाटण तालुक्यात मान्सून सक्रिय झाला असून गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढू लागला आहे. बुधवारी रात्रीपासून तर कोयना पाणलोट क्षेत्रासाहित संपूर्ण पाटण तालुक्यात  पावसाने उघडीप न देता मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे. परिणामी कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात प्रतिसेकंद 41 हजार 929 क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ सुरू झाली असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणातील पाणीसाठा 33.31 टीएमसी इतका झाला आहे.

कोयना धरण परिसरसाहित संपूर्ण पाटण तालुक्याला ही मुसळधार पावसाने झोडपून काढण्यास सुरवात केली असून बुधवारी रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील तालुक्यातील ओढे, नाले ओसंडून भरून वाहत आहेत.   कोयना, मोरणा, केरा या नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने नदीकाठच्या शेतीही पाण्याखाली गेल्या आहेत. गुरुवारी सायंकाळनंतरही पावसाचा जोर कायम होता.

कोयनानगर येथे  251 मिलिमीटर पावसाची नोंद

दरम्यान गेल्या चोवीस तासांत गुरुवारी सकाळी आठपर्यंत कोयनानगर येथे 251 मिलिमीटर (443), नवजा 244 (512) तर महाबळेश्वर येथे 198 मिलिमीटर ( 582 ) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी 633.88 मीटर इतकी झाली आहे. तर बुधवारी सकाळी 8 वाजता 2074 फूट असणारी धरणाची पाणीपातळी चोवीस तासांत तब्बल 8 फुटांनी वाढून ती गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 2082.7 फूट इतकी झाली.

Related Stories

नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे फेरीवाल्यांचे नुकसान

Amit Kulkarni

अंत्यसंस्कारासाठी दहा हजाराची मागणी

Patil_p

सातारा : ‘म मॅरेथॉन’ पुस्तकाचे प्रकाशन

datta jadhav

सातारा : टोलमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही

datta jadhav

महामार्गावरील पथदिवे दुरुस्ती आवश्यक

Patil_p

सातारा जिल्ह्यातील १६३ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

Shankar_P
error: Content is protected !!