तरुण भारत

दिलासादायक : पॉझिटिव्हीटी रेट 7.03 टक्के

24 तासात 11 हजार 788 चाचण्या  : 24 तासात 820 नवे रूग्ण वाढले ,27 बाधितांचा मृत्यू ,कराड, सातारा तालुक्यात रूग्णवाढ

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

जिह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख जून महिन्यात हजाराच्या खाली आला असला तरी तो आणखी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी ग्रामिण भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिह्यात 11 हजार 788 संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 820 रूग्ण पॉझिटिव्ह आले. जिह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे जून महिन्यात पहिल्यांदाच पॉझिटिव्हीटी रेट हा 7.03 वर आला आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढले असून कराड तालुक्यात 205 तर सातारा तालुक्यात 188 नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. 

चाचण्यांचे प्रमाण वाढले..

जिह्यात गेल्या 24 तासात 11 हजार 788 नवे रूग्ण वाढले आहेत. जिह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रॅपीड एण्टीजन टेस्ट 8 हजार 615 जणांनी केली. या टेस्टमधे 516 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. आरटीपीसीआर टेस्ट 3 हजार 173 जणांनी केली त्यामधे 313 जण पॉझिटिव्ह आढळले. एकूण 11 हजार 788 जणांनी टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये 820 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिह्यात कोरोना ग्रामीण भागासह शहरी भागात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून त्यामुळे कोरोना रूग्णांचा शोध घेऊन वेळेत उपचार सुरू होत आहेत.

निकट सहवासितांच्या तपासणीला वेग

जिह्यात दुसरी लाट आल्यानंतर कोरोना रूग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे रूग्णवाढीचा वेग हाताबाहेर गेला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ानंतर प्रशासन अलर्ट झाले. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून कोरोना रूग्ण  सापडल्यावर त्याच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या करण्याचा वेग वाढवला. त्यामुळे जिह्याच्या ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढली आहे. कोरोना रूग्णांचे निकट सहवासित सुपरस्प्रेडर ठरत असल्याने आरोग्य यंत्रणा व स्थानिक प्रशासन जून महिन्यात चांगलेच अलर्ट झाले आहे. 

तालुकानिहाय बाधितांची संख्या

जावली 54 (8,228),  कराड 205 (25,197), खंडाळा 37 (11,373), खटाव 61 (18,541), कोरेगाव 84 (15,970), माण 56 (12,554), महाबळेश्वर 8 (4,205), पाटण 39 (7,852), फलटण 43 (27,707), सातारा 188 (38,549), वाई 43 (12,262) व इतर 2 (1,212) असे आज अखेर एकूण 1,83,655 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

27 बाधितांचा मृत्यू

गेल्या चोवीस तासात 27 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तालुकानिहाय मृत्यू व एकूण पुढीलप्रमाणे-जावली 0 (185), कराड 2 (739), खंडाळा 0 (146), खटाव 5 (462), कोरेगांव 1 (366), माण 2 (249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 4 (180), फलटण 2 (276), सातारा 11 (1178), वाई 0 (322) व इतर 0, असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 4147 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

938 जणांना डिस्चार्ज

गेले काही दिवस कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या चोवीस तासात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 938 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

2802 बेड रिकामे संसर्ग कमी झाल्याने बेड रिकामे राहात आहेत. जिल्हय़ात 4860 बेड पैकी 2802 बेड रिकामे होते. तर गुरूवारी केवळ 1812 जणांना लसीकरण करण्यात आले.

Related Stories

सातारा झाला 71 व्या प्रजासत्ताक दिनासाठी सज्ज

Patil_p

सातारकरांना सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ कळेना

Patil_p

सातारा : नागठाणे ‘जनता कर्फ्यु’ला स्टील विक्री दुकानदारांकडून कोलदांडा ?

triratna

सातारा: दहशत माजविणाऱ्या कोयता गँगच्या म्होरक्यासह साथीदाराला अटक

triratna

कारगिल विजय दिवसाचे औचित्याने श्रमदान, वृक्षारोपण

Patil_p

सातारा पालिका अतिक्रमण हटाव विभागाचे व्यापाऱ्यांच्या मनमानीकडे दुर्लक्ष

triratna
error: Content is protected !!