तरुण भारत

कृष्णा कारखान्यात अखेर तिरंगी लढत

सत्ताधारी सहकार पॅनेलविरोधात संस्थापक, रयत पॅनेल रिंगणात, एकत्रीकरणाचे प्रयत्न असफल

प्रतिनिधी /कराड

Advertisements

रेठरे बुद्रक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेर तिरंगी लढत होणार असल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलविरोधात विरोधकांचे एकच पॅनेल करण्याचे प्रयत्न असफल ठरले आहेत. त्यामुळे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल व माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे यशवंतराव मोहिते रयत पॅनेल रिंगणात उतरले आहे. एकूण 21 जागांसाठी 66 उमेदवार रिंगणात आहेत.

तीन पॅनेलच्या 63 उमेदवारांसह 3 अपक्षही रिंगणात आहेत. अर्ज माघार झाल्यानंतर तिन्ही पॅनेलकडून उमेदवार जाहीर करण्यात आले. शुक्रवार 18 रोजी चिन्ह वाटप होणार आहे.

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे उमेदवार –

वडगाव हवेली ा दुशेरे गट 1 -धोंडिराम जाधव दुशेरे, जगदीश जगताप वडगाव हवेली, सयाजी यादव येरवळे. कार्वे ाकाले गट 2-दयाराम पाटील काले, गुणवंतराव पाटील आटके, निवासराव थोरात कार्वे. नेर्ले ा तांबवे गट 3-दत्तात्रय देसाई वाठार, लिंबाजी पाटील तांबवे, संभाजीराव पाटील नेर्ले. रेठरे हरणाक्ष ा बोरगाव गट 4-जयवंत मोरे रेठरे हरणाक्ष, जितेंद्र पाटील बोरगाव, संजय पाटील इस्लामपूर. येडेमच्छिंद्र ा वांगी गट 5-शिवाजी पाटील येडेमच्छिंद्र, बाबासाहेब शिंदे देवराष्ट्रे. रेठरे बुद्रुक ा शेणोली गट 6-डॉ. सुरेश भोसले रेठरे बुद्रुक, बाजीराव निकम शेरे. अनुसूचित जाती -विलास भंडारे टेंभू. महिला प्रतिनिधी -इंदुमती जाखले नेर्ले, जयश्री पाटील बहे. इतर मागासवर्गीय -वसंतराव शिंदे विंग, भटक्या जाती -अविनाश खरात (खरातवाडी).

संस्थापक पॅनेलचे उमेदवार –

गट 1-उत्तम पाटील दुशेरे, अशोक जगताप वडगाव हवेली, सर्जेराव लोकरे येरवळे.  गट 2- विजयसिंग पाटील- आटके, सुजित थोरात कार्वे, पांडुरंग पाटील- काले. गट 3- सुभाष पाटील नेर्ले,  विक्रमसिंह पाटील तांबवे, मारूती मोहिते बेलवडे बुद्रुक. गट 4- शिवाजी पवार- इस्लामपूर, महेश पवार रेठरे हरणाक्ष, उदयसिंह शिंदे- बोरगाव. गट 5- बाबासाहेब पाटील येडेमच्छिंद, माणिकराव मोरे देवराष्टे^, गट 6-अविनाश मोहिते- रेठरे बुद्रुक, अधिकराव निकम शेरे. अनुसूचित जाती- शिवाजी आवळे शिरटे. महिला राखीव- मीनाक्षीदेवी दमामे बहे, उमा देसाई काले. इतर मागास प्रवर्ग- मिलिंद पाटणकर कासारशिंरबे. विशेष मागास प्रवर्ग -नितीन खरात खरातवाडी.

यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे उमेदवार –

गट 1 -डॉ. सुधीर जगताप वडगाव हवेली, बापूसाहेब मोरे कोडोली, सुभाष पाटील येरवळे. गट 2- सयाजीराव पाटील आटके, दत्तात्रय थोरात कार्वे, अजित पाटील काले. गट 3-मनोहर थोरात कालवडे, प्रशांत पाटील नेर्ले, गणेश पाटील तांबवे. गट 4-अनिल पाटील कामेरी, विश्वासराव मोरे-पाटील रेठरे हरणाक्ष, विवेकानंद मोरे रेठरे हरणाक्ष. गट 5-संजय पाटील येडेमच्छिंद्र, बापूसाहेब गणपतराव मोरे देवराष्ट्रे. गट 6- डॉ. इंद्रजित मोहिते रेठरे बुद्रुक, बापूसाहेब पाटील रेठरे खुर्द. अनुसूचित जाती -अधिकराव भंडारे टेंभू. इतर मागास प्रवर्ग – शंकरराव रणदिवे कासेगाव. भटक्या विमुक्त जाती-आनंदराव मलगुंडे इस्लामपूर. महिला राखीव- सत्वशीला थोरात बहे, उषा संपतराव पाटील शेरे.

Related Stories

सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्वर्गीय पी.डी. पाटील यांना जाहीर

Patil_p

दुसरी लाट थोपवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

Patil_p

सातारा : औंधचा सुपुत्र डॉ. आशिष पवारची सहाय्यक शास्त्रज्ञपदी निवड

triratna

लॉकडाऊन काढण्याची सातारा प्रशासनाची मानसिकता पण हवी

datta jadhav

सातारा : वाई पोलीस उपविभागाच्या उपाधिक्षक डॉ. शीतल जानवे (खराडे) यांनी स्वीकारला पदभार

triratna

जिल्ह्यात मान्सुन सक्रीय

Patil_p
error: Content is protected !!