तरुण भारत

जिल्हय़ात धुवाँधार पाऊस

कोयनेतील पाणी साठा वाढला : जनजीवन विस्कळीत : महाबळेश्वरला 143 मि.मी. नोंद : कास तलाव ओव्हरफ्लो

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

जिह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी रात्रीपासून धुवाँधार पाऊस सुरू आहे. यामुळे ओढे, नदी नाले भरुन वाहू लागलेत असून धरणांमधील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. कोयना धरणात दिवसात जवळपास 3 टीएमसी पाणीसाठा वाढला. कराड, साताऱयातही गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस होता. या पावसामुळे जिह्यात अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा आला. तर तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जिह्यात गत तीन दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने जोर धरण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात संततधार पाऊस कोसळत आहे. बुधवारीही दमदार पाऊस झाला असून गुरुवारी दिवसभर पश्चिम भागात मान्सूनच्या सरीवर सरी कोसळत होत्या. कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना या भागात पावसाने उसंतच दिली नाही. त्यातच धरण परिसरातही जोरदार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठय़ात वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. साताऱयाला पाणी पुरवठा करणारा कास तलाव देखील यावर्षी लवकरच ओव्हरफ्लो वाहत असून यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे.

कराड तालुक्यालाही पावसाने झोडपले. कराड ते विटा रस्त्यावर पहिल्याच पावसात पाणी पाणी झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. तर गोटे गावच्या हद्दीत व मलकापूर परिसरात महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पाटण तालुक्यातील चाफळे विभागात दाढोली-महाबळवाडी दरम्यानच घाट रस्ता पहिल्याच पावसात खचून गेला. तसेच मोरीपूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद पडली.

कोयना धरण परिसरात दोन दिवसांपासून जोर आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत 251 मिलीमीटर पाऊस पडला. तर धरणात 21672 क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. धरणातील पाणीसाठा 31.67 टीएमसी झाला. तर बुधवार सकाळपासून जवळपास 3 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.

महाबळेश्वरला 143 मि.मी. पावसाची नोंद

बुधवारपासून गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जिह्यात सरासरी 46.8 मिलीमीटर पाऊस पडला. तर आतापर्यंत सरासरी 143.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आहे. जिह्यात गुरूवारी सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये अशी आहे. सातारा 40 (146.6), जावळी 80.1 (230.9), पाटण 82.3 (170.3), कराड 98.9 (203.7), कोरेगाव 20.4 (104.4), खटाव 15.1 (78) माण 4.6 (57.2), फलटण 2.8 (64.1), खंडाळा 6.8 (77.5), वाई 18.7 (128.4), महाबळेश्वर 143 (389). 

राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी

राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठल्याने त्याचा वाहतुकीस अडथळा होत होता. अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्तेही पाण्यात बुडून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. महामार्गावर साठलेल्या पाण्यातून वाहने पाण्याचे फवारे उडवत येत जात होती. पावसाळय़ात ज्या ज्या ठिकाणी पाणी साठते तिथे पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाय योजना करण्यास हायवे प्राधिकरणाला वेळ मिळाला नाही. मात्र टोलवसुली सुरुच असल्याच्या प्रतिक्रिया वाहनधारकांनी व्यक्त केल्या.

Related Stories

साताऱयासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदमांची मेहरनजर

Patil_p

रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयामुळे पुढाऱयांची झाली गोची

Patil_p

सातारा : गोडोलीतील भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 2 लाख 22 हजारांची देणगी

datta jadhav

शहरात 18 कोटींची रस्त्यांची कामे मार्गी लावणार

Patil_p

जिह्यात पोस्ट बॅकेकडून 15 कोटीचे वाटप

Patil_p

विकेल ते पिकेल योजना शेतकऱ्यांना फायदेशीर : माजी आमदार प्रभाकर घार्गे

triratna
error: Content is protected !!