तरुण भारत

सातारा शहराला पावसाने झोडपले

शाहुनगरात कॉलन्याला आले तळय़ांचे स्वरुप : शाहुपूरी, गडकर आळीत रस्त्यांना आले ओढय़ांचे स्वरुप.राधिका पॅलेसजवळ तर रस्त्यातच पाणीच पाणी

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

सातारा शहर व परिसरात मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने चांगलीच त्रेधा उडवून दिली. शहरातील रस्ते, नाले जलमय झाले होते. शहरातील प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी साठले होते. शाहुपूरीमध्ये मुख्य चौकापासून गडकर आळीत रस्त्याला ओढयाचे स्वरुप आले होते. शाहुनगरात शिवनेरी कॉलनीअंतर्गत येणाऱया विविध कॉलन्यांमध्ये पाणीच पाणी साठले होते. काही ठिकाणी तळीच निर्माण झाली होती.  झालेल्या पावसाने राधिका पॅलेसजवळ रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. यामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते.

सातारा शहरात मान्सूनच्या पावसाची दमदार एन्ट्री झाली असून गुरुवारी सकाळपासूनच पावसाची संतत धार सुरु होती. त्यामुळे शहरातील नागरिक सकाळी 9 वाजता आपली दुकाने उघडतात तर काहीजण पहाटेच मॉर्निंग वॉकला जातात. काहीजण सायकलिंगला जातात. त्यांना या पावसामुळे जाता आले नाही. झालेल्या पावसामुळे शहर व उपनगरातील सखल भागात पाणी साठले होते. शहरातील राधिका रोडवर हॉटेल राधिका पॅलेसच्यासमोर पाणी साठले होते. भोसले मळय़ात काही ठिकाणी पाणी साठले होते. शाहुनगर येथील शिवनेरी कॉलनीत पाणी साठले होते. चार वर्षापासून ओढयावर पाईपा टाकल्या गेल्याने मोकळय़ा जागेत पाणी साठल्याने तलावाचे स्वरुप आले होते. राजवाडा परिसरात पावसात उशीरा बाजारपेठेतील दुकाने सुरु झाली. भाजी विक्री करणाऱयांची दुकाने सुरु होती. तर जिल्हा परिषदेच्या मैदानावरील सगळा चिखलाचा राडारोडा झाला होता. कुठेही नुकसान झाले नाही. मात्र, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते.

दरम्यान, सुरु असलेल्या पावसामुळे राजवाडा परिसरातील समोरील स्व.अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या पार्कींगमध्ये पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे त्या पार्किंगमध्ये ज्यांचे हातगाडे लावले होते. ते सकाळी त्यांना काढता आले नव्हते.

Related Stories

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाया युवकास कर्नाटकातून अटक

Patil_p

शिक्षणाधिकाऱयांनी पाच शिक्षकांना बजावल्या नोटीसा

Amit Kulkarni

वारणानगर (लांडेवाडी) येथील तीन महिला कोरोना पॉझिटिव्ह

triratna

जिल्हा रुग्णालयातील आरटी-पीसीआर यंत्रणा बंद

Patil_p

सातारा : घाटाई मंदिर परिसरात दारू-मटण पार्ट्या जोमात

datta jadhav

पालिकेच्या कर्मचाऱयांना मिळणार पत्नीच्या नावाने घरे

Patil_p
error: Content is protected !!